शिवसेना हा सामाजिक बांधिलकी जपणारा एकमेव पक्ष- आनंद बोंढारकर

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात जिल्हा समन्वयक धोंडू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (ता. १३) शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेचा छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर फाटा धनेगाव येथे शुभारंभ करण्यात आला.
शिवसेना हा सामाजिक बांधिलकी जपणारा एकमेव पक्ष- आनंद बोंढारकर
शिवसेना अभियानमध्ये बोलताना जिल्हाप्रमुख बोंढारकर

नांदेड : शिवसेना हा सामाजिक बांधिलकी जपणारा एकमेव पक्ष असून राज्यात नियोजनबद्ध काम करुन कोरोनाला आटोक्यात आणण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले असे स्पष्ट करीत सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून विविध शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या माणसांपर्यंत पोचण्यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी प्रयत्न करावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद तिडके बोंढारकर यांनी केले.

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात जिल्हा समन्वयक धोंडू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (ता. १३) शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेचा छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर फाटा धनेगाव येथे शुभारंभ करण्यात आला.

हेही वाचा - खासदार हेमंत पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्षस्थळाची पाहणी केली. याठिकाणी साचलेल्या पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच पर्यायी मार्गावर भराव टाकून रस्ता तात्काळ मोकळा करावा अशा सुचना दिल्या.

शिवसेना हा सामाजिक बांधिलकी जपणारा एकमेव पक्ष असून राज्यात नियोजनबद्ध काम करुन कोरोनाला आटोक्यात आणण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले असे स्पष्ट करीत सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून विविध शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांना मिळवून देत मुख्यमंत्री आणि शिवसेनेने केलेल्या जनहितार्थ व सामाजिक कामाची माहिती प्रत्येक घरात पोहचवा असे आवाहन जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांना उपस्थित शिवसैनिकांना केले.

यावेळी शिवसेना लोकसभा संघटक डाॅ. मनोजराज भंडारी, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, नांदेड दक्षिण तालुकाप्रमुख उद्धव पाटील शिंदे, शहरप्रमुख तुलजेश यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब महाराज, शिवाजी कदम, माजी तालुकाप्रमुख अशोक मोरे, तालुकासंघटक बालाजी भायेगावकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख निर्गुण पुयड, युवासेना तालुकाप्रमुख बालाजी सपुरे, उपतालुकाप्रमुख अशोक वांगीकर, शेख रहेमान, बाबुराव उबाळे, तुकाराम पवार, हानमंत भवर, श्याम पाटील, श्री. वानखेडे, सर्कलप्रमुख संभाजी जाधव, नामदेव पुयड, मुरली पुयड, सुरेश वांगीकर, भगवान पुयड, साईनाथ येनावार, गौरव शिंदे, प्रभाकर गायकवाड, विभागप्रमुख मुन्ना देशपांडे, उत्तमराव शिंदे, बामनाजी पाटील, मनोहर कोकुलवार, गणेशराव जाधव, शिवाजी जाधव, साई शिंदे, प्रकाश जोंधळे, श्रीरंग बिंगेवाड, मारुती शिंदे, संतोष देशमुख, गंगाधर खोसडे, साईनाथ खोसडे, पांडुरंग पुयड, आनंद पुयड आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com