
जालना : शिवसेनेचे (ShivSena) उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. या बातमीमुळे जालना जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील शिवसेनेला जबर धक्का पोहचला आहे. निष्ठावंत असल्यानं खोतकर यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे उपनेतेपद बहाल केलं होतं. मात्र आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत खोतकर यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश घेतला. (Arjun Khotkar Raosaheb Danve Latest News)
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांना पेढा भरवून त्यांचं शिंदे गटात स्वागत केलं आहे. दोन दिवसांपूर्वीच खोतकर यांनी आपण ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असून शिंदे गटात कधीही जाणार नाही असा दावा केला होता. मात्र आज शिंदे गटात खोतकर यांनी प्रवेश केल्याने हा जिल्ह्यातील शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित जालना सहकारी साखर कारखान्यावर ईडीने फास कसला असून कारखान्याची मालमत्ता, जमीन यंत्र सामग्री सील केली आहे. त्यामुळेच खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. ईडीच्या रडारवर काही दिवसांपूर्वीपासून अर्जुन खोतकर होते. अर्जुन खोतकर यांच्या घरासह त्यांच्या नातेवाईकांची देखील कसून चौकशी करण्यात आली होती. (Eknath Shinde Arjun Khotkar Latest News)
दरम्यान, मातोश्रीवर अर्जुन खोतकर भेटण्यासाठी गेले असता त्यांची साधी विचारपूस सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडून केल्या गेली नव्हती. त्यामुळे अर्जुन खोतकर नाराज होते. गेल्या महिन्यात खोतकर यांच्या विरुद्ध ईडीच्या फास आवळत गेल्याने खोतकरांच्या अडचणीत वाढ झाली होती.
साम टिव्हीने सर्वात अगोदर खोतकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं वृत्त प्रसारित केलं होतं. त्यानंतर मात्र, अर्जुन खोतकर आपण ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असून शिंदे गटात कधीही जाणार नाही असा दावा केला होता. मात्र आज खोतकर यांची निष्ठा तुटली. ईडीच्या फासात अडकलेल्या खोतकर यांनी अखेर शिंदे गटात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याने सगळ्यांचाच भुवया उंचावल्या आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.