शाहरुख खानच्या मुलासाठी शिवसेना नेता सर्वोच्च न्यायालयात

एनसीबीच्या कामाची चौकशी करण्याची मागणी
शाहरुख खानच्या मुलासाठी शिवसेना नेता सर्वोच्च न्यायालयात
शाहरुख खानच्या मुलासाठी शिवसेना नेता सर्वोच्च न्यायालयातSaam Tv

नागपूर - शाहरुख खानच्या मुलासाठी शिवसेना नेता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. किशोर तिवारी यांनी या याचिकेमध्ये आर्यन खानच्या सुटकेची मागणी केली आहे. तसेच एनसीबीच्या कामाची चौकशी करण्याची मागणीही किशोर तिवारी यांनी केली आहे. ई-मेल द्वारे किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

हे देखील पहा -

तसेच समिर वानखेडे भाजपच्या कार्यकर्त्यासारखे काम करतात त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी देखील किशोर तिवारी यांनी केली आहे.एनसबीच्या कामाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी या याचिकेत करण्यात आल्याचं किशोर तिवारी यांनी सांगितले. एनसीबीने मूलभूत हक्कांचा भंग केला आहे. सुट्टी आहे म्हणून आर्यनला पाच दिवस डांबून ठेवले गेले,असे सांगतानाच झोनल अधिकाऱ्याचा बॉलिवूडमध्ये वेस्टेड इंटरेस्ट आहे. त्यांची पत्नी सिनेमात काम करते. हा सर्व त्यांचा दुराग्रह आहे,असे देखील ते म्हणले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com