Hingoli: शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी या संदर्भात थेट राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लेखी पत्र लिहून, एसटी संपातील कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये तातडीने समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
Hingoli Shivsena MLA Santosh Bangar
Hingoli Shivsena MLA Santosh BangarSaam Tv

हिंगोली- राज्यभरात गेल्या दोन महिन्यांन पेक्षा जास्त दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा (St Worker) संप सुरू आहे. या संपावर अद्याप देखील तोडगा निघाला नसल्याने, हिंगोलीत (Hingoli) आगारातील तीनशे एसटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारला निवेदन सादर करून स्वइच्छा मरणाची परवानगी मागत टोकाची भूमिका घेतली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेनंतर आता परिवहन खाते ताब्यात असलेल्या सत्ताधारी शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांनी देखील सरकार विरोधात आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. (Hingoli Latest News Update)

हे देखील पहा -

हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी या संदर्भात थेट राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लेखी पत्र लिहून, एसटी संपातील कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये तातडीने समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले लेखी पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, विरोधी पक्ष व सत्ताधारी आमदार हे विलीनीकरणाच्या बाजूने असताना केवळ परिवहन मंत्री व मुख्यमंत्री आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.

Hingoli Shivsena MLA Santosh Bangar
महापालिका निवडणुकांमध्ये युवासेनेची सरशी, नव्या दमाचे नवे उमेदवार !

दरम्यान आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeary) यांना लिहिलेल्या पत्रात 63 एसटी कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत तुटपुंजी पगार मिळत असल्याने आर्थिक विवंचनेतून आपले जीवन संपवले आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून या मागण्यांचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे असे नमूद केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com