अमरावती हिंसाचार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख व महानगर प्रमुखांना अटक

दंगलीत शिवसेना सहभागी असूनही पोलीस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा पोलिसांवर सातत्याने आरोप होत.
अमरावती हिंसाचार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख व महानगर प्रमुखांना अटक
अमरावती हिंसाचार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख व महानगर प्रमुखांना अटक- SaamTV

अमरावती - अमरावती शहरात 12 आणि 13 तारखेला हिंसाचार झाला 13 तारखेच्या अमरावती बंदच्या मोर्चात भाजप व हिंदुत्ववादी संघटना यांचा सहभाग होता त्याच वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे महानगर प्रमुख पराग गुडदे यांच्यासह काही शिवसैनिक या बंदमध्ये सहभागी झाले, व प्रचंड घोषणाबाजी व नारेबाजी व चिथावणीखोर भाषणे सुद्धा केली. सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी जिल्हाप्रमुख राजेश वानखडे महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्यासह चार शिवसैनिकांना अटक केली आहे. यावरून या दंगलीत शिवसेनेचाही सहभाग होता हे आता स्पष्ट झाले आहे. दंगलीत शिवसेना सहभागी असूनही पोलीस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा पोलिसांवर सातत्याने आरोप होत.

अमरावती हिंसाचार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख व महानगर प्रमुखांना अटक
लहान मुलांना लस अन् जेष्ठांना बूस्टर डोस देण्याची केंद्राकडे मागणी- टोपे

तिकडे नांदेडमधूनही आता दोषींना अटक करण्याची मागणी होत आहे. भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे धरणे आंदोलन करत आहेत. नांदेडमधील दंगल ही पुर्वनियोजित होती, दंगलीतील प्रमुख आरोपींना अद्याप अटक करण्यात न आल्याचा आरोप भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांनी नांदेड मध्ये केला आहे. पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवून अवैध शस्त्र साठा जप्त करावा अशी मागणीही बोंडे यांनी केली आहे. दंगलीच्या निषेधार्थ नांदेडमध्ये आज भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी बोंडे बोलत होते.

दरम्यान राज्यात त्रिपुरामधील घटनेने अमरावती, मालेगाव, नांदेडमध्ये हिंसाचार उसळला होता. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक झाली, मालमत्तांचे नुकसान झाले. पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या सतर्कतेमुळे हिंसाचार वाढला नाही. त्यांनंतर गृहमंत्र्यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आणि अटक सत्र सुरु झाले. मालेगाव, नांदेड, अमरावतीमध्ये संशयितांना अटक करण्यात आली आहे. आणि पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com