खोतकरांच्या नेतृत्वात रास्ता रोको; मुख्याधिकाऱ्यांनी काढली आंदाेलनाची हवा

गेल्या नऊ महिन्यांपूर्वी निजाम कालीन मूर्तीवेसला रात्रीच्या वेळी अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या धडकेत मूर्तीवेस कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.
shiv sena rasta roko andolan in murtives
shiv sena rasta roko andolan in murtivessaam tv

जालना : मूर्तीवेस कामाच्या मंजूरीचे श्रेय खेचण्यासाठी अर्जुन खोतकरांच्या (arjun khotkar) नेतृत्वाखाली शिवसेनेचे (shivsena) रास्ता रोको आंदोलन (rasta roko andolan) आज मूर्तीवेस येथे सुरु आहे. दरम्यान ज्यासाठी आंदाेलन करीत आहात त्याची दोन दिवसांपूर्वीच मंजूरी मिळाली आहे असे सांगत नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या आंदोलनातील हवाच काढून घेतली. (arjun khotkar latest marathi news)

जालना (jalna) शहरातील मूर्तीवेस ही निजामकालीन वेस कोसळून पडल्यामुळे मूर्तीवेस रस्ता नऊ महिन्यांपासून बंद आहे. दोन दिवसांपूर्वीच मूर्तीवेसच्या कामाला नगर परिषदेने मंजुरी दिलेली असतानाही आज शिवसेनेच्या वतीने मूर्तीवेस परीसरात श्रेयवाद खेचण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

shiv sena rasta roko andolan in murtives
Solapur: बार्शीतील २ सराफांसह ७ अटकेत, ६ जणांचा शाेधू सुरु : तेजस्वी सातपुते

शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलना दरम्यान शिवसैनिकांनी मूर्तीवेसचे काम तातडीने सुरु करुन मूर्तीवेस रस्त्यावरील वाहतूक सुरू करण्याची मागणी केली. गेल्या नऊ महिन्यांपूर्वी निजाम कालीन मूर्तीवेसला रात्रीच्या वेळी अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या धडकेत मूर्तीवेस कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.

आंदाेलन स्थळी पाेहचले मुख्याधिकारी

अखेर दाेन दिवसांपूर्वीच मूर्तीवेसच्या कामासाठी नगर परिषदेने मंजुरी दिलेली असतानाही आज खोतकरांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मूर्तीवेसच्या कामाला मंजुरी देऊन रस्ता सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. हे आंदोलन श्रेयवादासाठी केल्याची चर्चा शहरातील नागरीकांमध्ये होत आहे. दरम्यान पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन दोन दिवसांपूर्वीच या कामाला मंजुरी मिळाल्याचे सांगून शिवसेनेच्या आंदोलनातील हवा काढून घेतली.

Edited By : Siddharth Latkar

shiv sena rasta roko andolan in murtives
Hottal Mahotsav: नऊ एप्रिलपासून होट्टल महोत्सवाचे आयाेजन : डॉ. विपीन इटनकर
shiv sena rasta roko andolan in murtives
Satara: उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शिखर शिंगणापूर यात्रेस ग्रीन सिग्नल
shiv sena rasta roko andolan in murtives
Rajapur: रिफायनरी विराेधात जनता एकवटली; आज माेर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com