Politics : राज्यात शिवसेनेची सत्ता, मग पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर का नसावा?

आगामी महापालिका निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदार संघातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणा; शिवसेना खासदार संजय राऊत यांचे शिवसैनिकांना आवाहन
राज्यात शिवसेनेची सत्ता, मग पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर का नसावा?
राज्यात शिवसेनेची सत्ता, मग पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर का नसावा?गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : गेल्या पन्नास वर्षात आपण शिवसेना घराघरात पोहोचली पाहिजे असं म्हणतच राहीलो, मात्र शिवसेना घराघरात पोहचू शकली नाही, हे आपले अपयश आहे आणि ते दूर करण्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदार संघातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणा असे भावनिक आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भोसरी येथे शिवसेना मार्गदर्शन मेळाव्याला संबोधित करताना शिवसैनिकांना केले आहे.

राज्यात शिवसेनेची सत्ता आहे, मग शहरात शिवसेनेचा महापौर का नसावा ? असा प्रश्न संजय राऊत यांनी शिवसैनिकांना केलाय. तुम्ही 100 नगरसेवक निवडून आणा अशी माझी अपेक्षा नाही, मात्र महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत महापौर तरी निदान आपला असावा इतके तरी नगरसेवक निवडून आणा असं संजय राऊत म्हणाले.

हे देखील पहा :

Pune : "अजित पवार तुम्ही आमचं ऐका नाहीतर गडबड होईल" पहा Videoपिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीमध्ये राहुल कलाटे आठ-दहा नगरसेवक निवडून आणू शकतात तसेच खासदार श्रीरंग बारणे देखील आठ-दहा नगरसेवक निवडून आणू शकतात. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा देखील महापौर होऊ शकतो, पंचावन्न आमदारांचा मुख्यमंत्री होतो, त्यामुळे तीस-चाळीस नगरसेवकांचा देखील महापौर होऊ शकतो अशी शक्यता संजय राऊत यांनी भोसरी येथील शिवसेनेच्या पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्यात व्यक्त केली आहे.

राज्यात शिवसेनेची सत्ता, मग पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर का नसावा?
Pune : "अजित पवार तुम्ही आमचं ऐका नाहीतर गडबड होईल" पहा Video

शिवसेनेचा जरी भोसरी विधानसभा क्षेत्रात एकही नगरसेवक नसला तरी, भोसरी मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने महापालिका निवडणूक लढण्यास अनेक पदाधिकारी उत्सुक आहेत. असं देखील संजय राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी भोसरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेकडून आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार संतोष तानाजी वाळके यांचा कार्य अहवाल प्रकाशित केला.

संतोष वाळके यांनी कोरोना काळात केलेल्या वेगवेगळ्या मदत कार्याचा अहवाल संजय राऊत यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पुणे शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर, सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर तसेच मावळ लोकसभा क्षेत्राचे खासदार श्रीरंग बारणे, शिव सेना उपनेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com