
चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील नगर पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. कुरखेडा, मूलचेरा आणि अहेरी नगराध्यक्षपदासाठी आज निवडणूक (Election) झाली. त्यात सेनेने घवघवीत यश मिळवले. कुरखेडा नगर पंचायत अध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली. सेनेच्या सुनीता बोरकर या नगराध्यक्ष झाल्या आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना (Shivsena) नेते किरण पांडव यांनी यासाठी किल्ला लढवला होता.
हे देखील पहा -
त्यांच्या प्रयत्नांना आज यश आले. विशेष म्हणजे भाजपचे बाहुल्य असलेल्या कुरखेडा येथे शिवसेनेची ही कामगिरी मोठी मानली जात आहे. आज मतदानादरम्यान कुरखेडा येथे भाजपच्या बंडखोर नगरसेविका जयश्री रासकर मतदानासाठी येत असताना शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाली. मात्र पोलिसांनी लगेच वातावरण शांत केले.
मुलचेरा नगर पंचायतीच्या अध्यक्षपदीही शिवसेनेचे विकास नैताम विजयी झाले. तर अत्यंत चुरशीच्या अहेरी नगर पंचायत अध्यक्ष निवडणुकीत शिवसेना- आदिवासी विद्यार्थी संघटना सत्तेत बसली. येथे दोन्ही काँग्रेस हात चोळत राहिले. आविसंच्या रोजा करपेत अध्यक्ष, तर शिवसेनेचे शैलेश पटवर्धन उपाध्यक्षपदी विराजमान झाले. शिवसेनेने महत्वाच्या तीनही नगर पंचायतींमध्ये मिळवलेले हे यश भाजप आणि काँग्रेसला धक्कादायक ठरले आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.