टीका करणं सोपं असतं; शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचा इम्तियाज जलीलांना टोला!
टीका करणं सोपं असतं; शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचा इम्तियाज जलीलांना टोला!SaamTV

टीका करणं सोपं असतं; शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचा इम्तियाज जलीलांना टोला!

'एक उंगली हमारे तरफ है तो चार उंगलीया आपके तरफ है' हे इम्तियाज यांनी विसरू नये.

औरंगाबादची : नगर आणि नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नेत्यांनी सत्तेचा वापर करून पाणी अडवल्यामुळे मराठवाड्यात (Marathwada) पाण्याची तूट निर्माण झाली आहे असे वक्तव्यं शिवसेना नेते आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलं आहे. सत्तार आज औरंगाबादमधील तापडीया नाट्यगृहात पाणी परिषदेत बोलत होते. यावेळी सत्तार यांनी एसआयएमचे MIM इम्तियाज जलील यांना टीका करणं सोप्प असतं मात्र काम मार्गी लावणे अवगड असतं असं म्हणत टोला लगावला आहे. (Shiv Sena's Abdul Sattar criticized Imtiaz Jalil)

हे देखील पहा-

दीड वर्षात औरंगाबादचा पाणी पुरवठा

या पूर्वीही औरंगाबादच्या (Aurangabad) पाणी पुरवठ्याचे (Water Supply) उद्घाटन झाले मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) नव्हते म्हणून ही योजना रखडली होती मात्र आता मा.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि ते ही योजना पूर्ण करतील तसेच येत्या दीड वर्षात औरंगाबादची पाणी पुरवठा योजना पुर्ण होईल असंही ते यावेळी म्हणाले.

टीका करणं सोपं असतं; शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचा इम्तियाज जलीलांना टोला!
धक्कादायक |लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवरती लैंगिक अत्याचार; नग्न फोटो व्हायरल करून केली बदनामी

दरम्यान उद्या एसआयएमचे MIM इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) उपहासात्मक आंदोलन करणार आहेत या पार्श्वभूमीवर सत्तार यांनी ही टीका केली आहे 'एक उंगली हमारे तरफ है तो चार उंगलीया आपके तरफ है' हे इम्तियाज यांनी विसरू नये. तसेच टीका करण सोपं असते हे देखील जलील यांनी विसरू नये असा टोलाही मंत्री अब्दुल सत्तार यांनी इम्तियाज जलील यांना लगावला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com