Beed Crime News : पालिकेची जमीन हडपली, पाच जणांवर गुन्हा दाखल, वकीलास अटक

विशेष म्हणजे खरेदी करणाऱ्यांना वकीलाने त्यांचे प्लॉट दाखविल्याचे सांगण्यात येत आहे.
beed, shivajinagar police station beed
beed, shivajinagar police station beedsaam tv

Beed News : प्लॉट हयात नसतानाही भूमी अभिलेख, रजिस्ट्री कार्यालयातील बोगस कागदपत्रे तयार करून बीड पालिकेची 60 लाख रुपयांची जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वकिलासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील अशोक शेटे यांना अटक केल्याची माहिती शिवाजीनगर पाेलिस ठाण्यातून देण्यात आली. (Maharashtra News)

beed, shivajinagar police station beed
Akola News : मोबाइलच्या बहाण्याने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, युवकास दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात राजेंद्र उर्फ अंबरीश काटे (वय 51, रा. संत नामदेवनगर, बीड) यांनी 23 मार्च रोजी या प्रकरणाबाबतची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी रजिस्ट्री ऑफिस, भूमी अभिलेख या कार्यालयांना पत्र पाठवून सर्व माहिती गाेळा केली.

beed, shivajinagar police station beed
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 : शिवबाच्या बाल मावळ्याची मृत्यूशी झुंज अपयशी; मावळात शाेककळा

या दोन्ही कार्यालयांनी दिलेल्या माहितीनंतर शिवाजीनगर पाेलिसांनी अँड. अशोक शेटे, मीनाबाई शेटे, साधना शिंदे, बाळासाहेब ढोले, बाळू शिंदे यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

बीड शहरातील प्लॉट क्र. 93 व 96 आणि मालमत्ता क्र.132150 हे दोन्ही प्लॉट नगर पालिकेच्या मालकीचे आहेत. असे असतानाही हे प्लॉट आपलेच असल्याचे सांगून आणि सर्व बनावट कागदपत्रे तयार करून शेटे यांनी हे प्लॉट इतरांना विक्री केले.

beed, shivajinagar police station beed
Gadchiroli News : गडचिरोलीच्या जंगलात पोलीस - नक्षलवाद्यांत चकमक, नक्षली ठार; SP Neelotpal यांनी दिली माहिती (पाहा व्हिडीओ)

विशेष म्हणजे खरेदी करणाऱ्यांना काटे यांचे प्लॉट दाखविल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व बाबींचा तपास करूनच पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यातील वकील अशोक शेटे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com