उदयनराजेंची 'ती' एन्ट्री म्हणजे वाऱ्यावरची वरात; शिवेंद्रराजेंची जोरदार टीका

आता शिवेंद्रराजे यांच्या या टीकेला उदयनराजे काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.
Shivendra Raje Bhosale
Shivendra Raje Bhosaleओंकार कदम

सातारा - नगरसेवक अविनाश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी जोरदार फटकेबाजी केली. या वेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. उदयनराजे यांच्या वाढदिवसा निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये खासदार उदयनराजे यांनी हवेतून मोटारसायकल वरून एंट्री केली होती.

हे देखील पहा -

या त्यांच्या एन्ट्री वर बोलत असताना आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले की, उदयनराजेंची ही एन्ट्री म्हणजे वाऱ्यावरची वरात आहे त्यांचे काम हे नेहमीच वाऱ्यावरच असतं जमिनीला धरून कोणतेही काम उदयनराजे करत नाहीत उदयनराजेंचे ती एन्ट्री म्हणजे स्वतःच्या कामाप्रमाणे होती अशी जोरदार टीका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे. आता त्यांच्या या टीकेला उदयनराजे काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com