Video: उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना आव्हान, दोन्ही राजेंमधील वाद चिघळणार?

पोस्टरबाजीवर खर्च करण्यापेक्षा सातारच्या विकासकामांवर खर्च केला असता तर बरं झालं असत - शिवेंद्र राजे
Video: उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना आव्हान, दोन्ही राजेंमधील वाद चिघळणार?
Video: उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना आव्हान, दोन्ही राजेंमधील वाद चिघळणार?Saam Tv

सातारा - येत्या डिसेंबर मध्ये सातारा नगरपालिकेची मुदत संपत आहे. त्यामुळे सध्या साताराचे दोन्ही राजे एकमेकांवर टीका करण्याची एक सुद्धा संधी सोडत नाही. नगरपालिका ही सध्या उदयनराजे यांच्या आघाडीकडे आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीच्या कामकाजावर आ.शिवेंद्रराजे यांनी जोरदार टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी शहरातील विकास कामांसाठी जाताना दुचाकी चालवली या वरून आ.शिवेंद्रराजे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.

या वेळी बोलत असतानाशिवेंद्रराजे  म्हणाले की, उदयनराजेंनी दुचाकी चालवण्या पेक्षा पाच वर्षे सातारची नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर एवढी पोस्टर बाजी करण्याची वेळ आली नसती. पोस्टरबाजीवर खर्च करण्यापेक्षा सातारच्या विकासकामांवर खर्च केला असता तर बरं झालं असत.नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने खा.उदयनराजे यांची ही नौटंकी सुरू असल्याचे टोला आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला आहे.

शिवेंद्रराजे यांनी केलेल्या टिकेवर बोलत असताना खा.उदयनराजे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. प्रतापगडावर भवानी मातेच्या दर्शनासाठी ते आले असताना त्यांनी शिवेंद्रराजेंच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. यावेळी बोलत असताना ते म्हणाले मला चारचाकी वरून फिरणं परवडत नाही. मी चालत फिरीन, रांगत फिरीन, लोळत फिरीन तुम्हाला याबद्दल दुःख वाटत असेल तर तुम्ही पण तसे करा असे सांगून जर हिम्मत असेल तर समोरा समोर या असा इशारा देखील खा.उदयनराजे यांनी आ.शिवेंद्रराजे यांचे नाव न घेता दिला आहे. 

या बाबत आज आमदार शिवेंद्रराजे यांनी बोलत असताना खा.उदयनराजे यांना खोचक टोले लगावले आहेत. पेट्रोल परवडत नाही म्हणतात मग BMW कार कशी घेतली? असा सवाल देखील आ.शिवेंद्रराजेंनी उपस्थित केला आहे. तसेच उदयनराजे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर बोलत असताना लोटांगण घाला सर्व करा पण नगरपालिकेला लोळवायची वेळ आनु नका असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला.

Video: उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना आव्हान, दोन्ही राजेंमधील वाद चिघळणार?
गोव्यात केलेल्या कामावरच आम्ही मतं मागणार: देवेंद्र फडणवीस

एकूणच काय तर सध्या सातारा नगरपालिकेच्या रणधुमाळीला सुरवात झाली असल्याचे साताराकर जनतेला जाणीव होऊ लागली आहे. सध्याच्या दोन्ही राजेंच्या चाललेल्या या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मुळे सातारा नगरपालिकेची निवडणूक रंगतदार होईल यात काही शंका नाही.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.