Satara : छत्रपतींबद्दल आदर म्हणताहेत अन्... अवघ्या काही तासांत राजेंचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

यापुर्वी एका मुलाखतीत संजय राऊत यांनी उदयनराजेंना छत्रपतींचे वंशज असल्याचा पूरावा मागितला हाेता.
Sanjay Raut, Satara, chhatrapati shivaji maharaj descendants, shivendraraje bhosale, shivgarjana yatra
Sanjay Raut, Satara, chhatrapati shivaji maharaj descendants, shivendraraje bhosale, shivgarjana yatrasaam tv

Shivendraraje Bhosale : आमच्या घराण्याचे आम्हांला पुरावे मागणाऱ्या व्यक्तीला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही. आता महाराष्ट्रात कोणीही संजय राऊत (sanjay raut) यांच्या वक्तव्याला फार महत्व देत नाही असे प्रत्युत्तर आमदार शिवेंद्रराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांनी राऊतांच्या टीकेवर दिले आहे. साता-यातील (Satara) सुरुची बंगला येथे माध्यमांशी बाेलताना राजेंनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेतला.

Sanjay Raut, Satara, chhatrapati shivaji maharaj descendants, shivendraraje bhosale, shivgarjana yatra
Udayanraje Bhosale News: उदयनराजेंना बालेकिल्ल्यात संजय राऊत प्रत्युत्तर देणार ?

शिवगर्जना संपर्क अभियानाच्या निमित्ताने खासदार संजय राऊत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी साता-यातील शाहू कला मंदिर सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संजय राऊतांनी आमदार शिवेंद्रराजे आणि राजघराण्यावर बाेचरी टीका केली.

Sanjay Raut, Satara, chhatrapati shivaji maharaj descendants, shivendraraje bhosale, shivgarjana yatra
Satara : छत्रपतींबद्दल आम्हांला आदर आहे, पण... राजेंच्या बालेकिल्ल्यात काय म्हणाले संजय राऊत, वाचा सविस्तर

या टीकेस आज आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी प्रत्युत्तर दिले. छत्रपतींच्या घराण्याबद्दल जर आदर होता तर युवराज संभाजीराजे छत्रपती यांना खासदारकीचे तिकीट का दिले नाही असा सवाल शिवेंद्रराजेंनी केला. खासदार संजय पवार यांना तिकीट देवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले गेले.

आमच्या घराण्याचे आम्हांला पुरावे मागणाऱ्या व्यक्तीला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही. आता महाराष्ट्रात कोणीही संजय राऊत यांच्या वक्तव्याचा फार महत्व देत नाही असेही शिवेंद्रराजेंनी नमूद केले.

Sanjay Raut, Satara, chhatrapati shivaji maharaj descendants, shivendraraje bhosale, shivgarjana yatra
Satara : गोडोली तळे परिसरात धर्मवीर संभाजीराजेंचा पुतळा बसविला जाणार : वृषालीराजे

संजय राऊत यांनी मागितले हाेते पूरावे

यापुर्वी एका मुलाखतीत संजय राऊत यांनी उदयनराजे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना उदयनराजे साताऱ्यात काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. या देशात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना बोलू द्या. ते माजी खासदार आहेत, भाजपचे नेतेही आहेत. त्यामुळे ते विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत.

मात्र, एखादा महापुरूष सर्वांचा असतो. देवी देवतांची पुजा करताना त्याला कोणी विचारायला जात नाही. तसेच महापुरूषांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या वंशजांना विचारण्याची पद्धत नाही. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असतील तर त्यांनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत, असे म्हटलं हाेते. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com