Maharashtra Politics : गेम झाल्याचे माझे विधान सेना नेत्याने मनाला लावून घेतले : शिवेंद्रसिंहराजे
Shivendraraje Bhosale, Satara, Sanjay Raut, Eknath Shinde, BJP, Shivsena saam tv

Maharashtra Politics : गेम झाल्याचे माझे विधान सेना नेत्याने मनाला लावून घेतले : शिवेंद्रसिंहराजे

आज (मंगळवार) सकाळपासून राज्यातील राजकीय घडामाेडींना वेग आला आहे. बहुतांश आमदार हे एकमेकांच्या संपर्कात आहेत. काही आमदार टीव्ही समाेर बसून राज्यात काय सुरु आहे हे पाहत आहे.

सातारा (satara latest marathi news) : महाराष्ट्रात (maharashtra) लवकरच देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नेतृत्वात सरकार येणार. त्याच्या हलचाली कालच्या विधान परिषद निवडणूकीच्या विजयानंतर (maharashtra vidhan parishad election result) सुरू झाल्या आहेत असे भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendrasinhraje bhosale) यांनी आज (मंगळवार) सुरुची बंगला येथे माध्यमांशी बाेलताना नमूद केले. (shivendrasinhraje bhosale latest marathi news)

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर (maharashtra vidhan parishad election result) आज (मंगळवार) सकाळपासून महाराष्ट्रातील राजकारणात (maharashtra politics) विशेषत: शिवसेनेत काही घडामाेडी घडल्या आहेत. शिवसेनेच्या (shivsena) काही आमदारांचे फाेन लागत नसल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सेनेचे (Shiv Sena latest News Updates) आमदार व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे 17 आमदारांचे माेबाईल फाेन नाॅटरिचेबल (Eknath Shinde not reachable) झाल्याने राज्यात राजकीय भुंकप घडणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

Shivendraraje Bhosale, Satara, Sanjay Raut, Eknath Shinde, BJP, Shivsena
राज्याच्या राजकारणात नवीन काही तरी घडणार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा अर्थ काय?

दरम्यान राज्यसभा निवडणुकीपुर्वी संभाजीराजेंची गेम झाली मी एवढेच म्हटले हाेते. मी काेणाचे नाव देखील घेतले नव्हते. त्यानंतर खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी ते मनाला का लावून घेतले काय माहिती. ते खासदार आहेत. त्यांचे किंवा काेणत्या पक्षाचे नाव घेतले नव्हते असे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले.

Shivendraraje Bhosale, Satara, Sanjay Raut, Eknath Shinde, BJP, Shivsena
Maharashtra Politics : 'नव्या घडामोडींमुळे महाराष्ट्रात बदल घडेल असे वाटत नाही'

महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येईल. त्याच्या हालचाली कालच्या विधान परिषद निवडणूकीच्या विजयानंतर सुरू झाल्या आहेत असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले विकासकामांच्या दृष्टीने आमदार व मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार महेश शिंदे यांच्याशी माझी नेहमी भेट हाेत असती. राज्यात मध्यावाधी निवडणुक हाेतील का नाही हे आत्ता सांगू शकत नाही असेही राजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Shivendraraje Bhosale, Satara, Sanjay Raut, Eknath Shinde, BJP, Shivsena
Ashadhi Wari 2022 : वारकऱ्यांना पुरेशा सुविधा द्या : पालकमंत्री बाळासाहेब पाटील
Shivendraraje Bhosale, Satara, Sanjay Raut, Eknath Shinde, BJP, Shivsena
काय तर मी खंडणी मागताे! उदयनराजेंनी दिलं अजित पवारांना ओपन चॅलेंज

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com