Shivendraraje Bhosale : शांत संयमी शिवेंद्रसिंहराजेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर, म्हणाले...

मर्जीतल्या ठेकेदारांना कामे देणे इतकाच त्यांच्या विकासाचा गाडा पुढे सरकलेले आहे.
shivendraraje bhosale, udayanraje bhosale, satara, Political News
shivendraraje bhosale, udayanraje bhosale, satara, Political Newssaam tv

Shivendraraje Bhosale News : उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale latest news) यांची अशी नेहमीची डायलाॅगबाजी आहे. त्यांच्या साविआचा भ्रष्ट कारभार सातारकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. तुम्ही महाविकास पुरुष आहात तर लाेकसभेला तुम्ही का पडलात ( उदयनराजेंचा पराभव का झाला) असा सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (Shivendraraje Bhosale) यांनी खासदार उदयनराजेंना केला आहे. (Breaking Marathi News)

shivendraraje bhosale, udayanraje bhosale, satara, Political News
Mahila Maharashtra Kesari Spardha : मीच मैदान मारणार ! पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीची आज अंतिम लढत

खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी सातारा शहरात विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उदयनराजेंनी आमदार भोसले यांच्या टीकेस उत्तर देताना तुमच्या कार्यकाळात कसा भ्रष्टाचार झाला याचे दाखले दिले. तसेच एवढ्या माेठ्या घराण्यात कसा जन्म झाला अशी जहरी टीका केली.

shivendraraje bhosale, udayanraje bhosale, satara, Political News
Pune : पुण्यातील भरवस्तीत युवकांचे धाडस; काेयता दाखवत दिवसाढवळ्या व्यापाऱ्याचे ४७ लाख लुटले

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत एका वृत्त वाहिनीशी बाेलताना उदयनराजेंच्या टीकेला तसेच आव्हानाला उत्तर दिले. ते म्हणाले आव्हानापेक्षा उदयनराजेंची डायलाॅग बाजी आता जूनी झाली. मिशा काढीन... भुवया काढीन... हे त्यांचे नेहमीचेच डायलॉग आहेत.

खरंतर त्यांच्या आघाडीचा भ्रष्ट कारभार सातारकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे. आम्ही विराेधक म्हणून पालिकेत सक्रिय होताे परंतु आमच्या नगरसेवकांनी काही बोलण्यापुर्वीच सत्ताधारी आघाडीमधील नगरसेवकांची भांडणं चव्हाट्यावर यायची.

shivendraraje bhosale, udayanraje bhosale, satara, Political News
Congress Party News : राहूल गांधींच्या लाेकप्रियतेला माेदी घाबरले : पृथ्वीराज चव्हाण

काेणाला किती कमिशन मिळालं यावर त्यांच्या नगरसेवकांमधील कलगी तुरा साताऱ्याने पाहिला आहे. या सर्व गाेष्टी प्रसार माध्यमातून जनतेने पाहिल्या आहेत, वाचल्या आहेत असेही शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले. त्यांनी सांगितलेल्य़ा काेणत्याही याेजना पुर्णत्वास आलेल्या नाहीत.

मर्जीतल्या ठेकेदारांना कामे देणे इतकाच त्यांच्या विकासाचा गाडा पुढे सरकलेले आहे. घंटागाडी निविदा प्रकरणांमध्ये वेतनाची ओढाताण झाल्यामुळे घंटागाडी चालक आत्महत्या करायला निघाले होते हे सुद्धा सातारकरांनी जवळून पाहिले आहे असेही आमदार भाेसले यांनी नमूद केले.

तुम्ही महाविकास पुरुष आहात तर तुमचा लोकसभा पोट निवडणुकीत का पराभव झाला. जनतेेने तुम्हांला का नाकारले असा सवाल आमदार भाेसले यांनी खासदार उदयनराजेंना केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com