Satara News : 'मुख्यमंत्रीही एकेकाळी रिक्षा चालवत हाेते'; शिवेंद्रराजेंनी गाठलं आरटीओ कार्यालय

यावेळी रिक्षा व्यावसायिक माेठ्या संख्येने सुरुची बंगला येथे जमले हाेते.
satara, shivendraraje bhosale
satara, shivendraraje bhosalesaam tv

Shivendraraje Bhosale News : सातारा शहरात रिक्षांची संख्या वाढली आहे. कोरोनानंतर पुन्हा रिक्षावाल्यांचा व्यवसाय सुरु झाला आहे. रिक्षावाल्यांच्या अनेक समस्या असून त्या सुटल्या पाहिजेत. एक किलोमीटरसाठी ३० रुपये, मीटरची चिप बदलण्यासाठी कमी दर आकारणी करणे आदीं मागण्यांबाबत तोडगा काढावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांना नुकतीच केली आहे. चव्हाण यांनी रिक्षावाल्यांच्या समस्येवर लवकरच तोडगा काढू असे आमदार भाेसले (shivendraraje bhosale) यांना आश्वासित केले. (Satara Latest Marathi News)

रिक्षावाल्यांच्या भाडेवाढ, मीटरची चिप बसविण्यासाठी कमी पैसे आकारावेत, शहरात रिक्षा स्टॉप वाढवावेत, रिक्षांची संख्या जास्त झाल्याने नवीन परवाने देऊ नयेत, रस्त्यांच्या कामामुळे बंद झालेले रिक्षा स्टॉप पुन्हा सुरु करून द्यावेत, स्टॉपवर रिक्षांची संख्या वाढवावी, रिक्षाच्या पाठीमागे नाव लिहिण्याची सक्ती करू नये आदी मागण्यांसाठी साताऱ्यातील विविध रिक्षा संघटनांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली होती. यावेळी रिक्षा व्यावसायिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आमच्यापैकीच एक हाेते त्यांच्यापर्यंत जाण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली हाेती. रिक्षावाल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार भाेसले यांनी थेट उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गाठले.

satara, shivendraraje bhosale
Satara News : किस्साच झाला ! शिवेंद्रराजे पाेहचताच उदयनराजेंचा फोन कट, मंत्री देसाई लागले हसू

यावेळी आमदार भाेसले आणि रिक्षाचालकांनी अधिकारी यांच्याशी चर्चा केली. तसेच रिक्षावाल्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या. रिक्षावाल्यांना दिलासा मिळण्यासाठी त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत. शासनाचे नियम असले तरी, समस्यांवर तोडगा काढता येऊ शकतो. याबाबत आपण सकारात्मक निर्णय घ्यावा. यांदर्भात जिल्हाधिका-यांशी चर्चा करू. त्यांनाही भेटून समस्या सोडवण्याची मागणी करू असे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी नमूक केले. (Maharashtra News)

satara, shivendraraje bhosale
Narayan Rane News : अजित पवारांच्या थापा मी ऐकल्या, काय म्हणाले नारायण राणे (पाहा व्हिडिओ)

यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, अनिल कुर्लेकर, अनिल चिकणे, विकी रणभिसे, गिरीश खंदारे, महेंद्र जाधव, काका जाधव, विठ्ठल कांबळे, रोहन इनामदार, प्रकाश गोळे, शिरीष गोळे, बलराज त्रिंबके, प्रदीप शिरसाट, सुशांत पवार, सुरेश पवार यांच्यासह अनेक रिक्षाचालक, मालक उपस्थित होते. विनोद चव्हाण यांनी मागण्यांचे निवेदन घेऊन (satara) जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करू, तसेच समस्या सोडविण्यासाठी योग्य तोडगा काढू असे आश्वासन यावेळी दिले.

Edited By : Siddharth Latkar

satara, shivendraraje bhosale
Ujani Dam News : विखे - पाटलांच्या भुमिकेने उजनीचं पाणी पेटणार ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com