पक्षाने त्यांना योग्य ती समज द्यावी : शिवेंद्रसिंहराजे भाेसले

पक्षाने त्यांना योग्य ती समज द्यावी : शिवेंद्रसिंहराजे भाेसले
shivendraraje bhosale

सातारा : वसमत विधानसभेचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार राजू नवघरे यांनी छत्रपती शिवरायांच्या अश्वावर चढून हार घालीत असल्याचे समाेर आल्यानंतर आमदार नवघरे यांच्यावर समाजमाध्यमातून जाेरदार टीका होत आहे. छत्रपती घराण्याचे वशंज आणि भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी देखील आमदार नवघरेंच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. shivendraraje-bhosale-on-wasmat-mla-raju-navghare-chhatrapati-shivaji-maharaj-statue-garland-sml80

shivendraraje bhosale
पवार साहेब जिंदाबाद! 'साेमेश्वर' राष्ट्रवादीचा, भाजपचा धुव्वा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्रांगणात आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले आमदार राजू नवघरेंवर कारवाई झालीच पाहिजे. सर्व राजकीय पक्षांनी लक्षात घेतले पाहिजे की सर्व महापुरुषांचा आदर ठेवण आपले काम आहे. पक्षाने आमदारांना योग्य ती समज द्यावी. शासनाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले shivendraraje bhosale यांनी केली आहे.

दरम्यान आमदार राजू नवघरे यांनी आपल्या कृतीबद्दल माफी मागितली असली तरीही समाज माध्यमातून त्यांचा तीव्र निषेध केला जात आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी देखील उपमुख्यमंत्र्यांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी आमदार नवघरेंवर कारवाई करावी अशी मागणी ट्विट करुन केली आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.