Satara : "हा तर उदयनराजेंच्या बुद्धीचा पराक्रम"; शिवेंद्रराजेंची खरमरीत टीका

काल खासदार उदयनराजें भोसलेंनी (UdayanRaje Bhosle) आ. शिवेंद्रराजें भोसलेंवरती टीका करत त्यांची बुद्धी लहान असल्याचे बोलले होते.
Satara : "हा तर उदयनराजेंच्या बुद्धीचा पराक्रम"; शिवेंद्रराजेंची खरमरीत टीका
Udayanraje/ ShivsendraRajeSaamTV

सातारा : साताऱ्यात (Satara) सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याने राजकीय खेळींना चांगलाच वेग आला आहे. शिवाय साताऱ्यात वर्चस्व असणारे दोन्ही राजे सध्या एकमेंकांवरती टीका करताना दिसतं आहेत. शिवाय दोन्ही राजे एकमेकांवरती टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.

हे देखील पहा -

कालच खासदार उदयनराजें भोसलेंनी (UdayanRaje Bhosle) आ. शिवेंद्रराजें भोसलेंवरती टीका करत त्यांची बुद्धी लहान असल्याचे बोलले होते, उदयनराजेंच्या याच टीकेला शिवेंद्रराजें भोसलेंनी (ShivendraRaje Bhosle) जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Udayanraje/ ShivsendraRaje
OBC आरक्षणाशिवाय उद्या 2 जिल्हा परिषद आणि 105 नगर पंचायतींसाठी मतदान !

शिवेंद्रराजे म्हणाले, 'होय आमची बुद्धी लहान असेल खासदार साहेबांची बुद्धी अफाट आणि अचाट आहे असे आमचे मत आहे. त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, उदयनराजेंच्या बुद्धीचे आविष्कार आणि पराक्रम बघितले तर लोकांच्यातून निवडून आलेली लोकसभा घालवून राज्यसभेत हे स्वतःच्या बुद्धीने जाऊन बसले हा उदयनराजेंच्या बुद्धीचा पराक्रम आहे.' अशी टीका शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवरती केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com