
Todays Raigad News : गड संवर्धनाचे काम करु की नाेकरशाह यांच्या मागे पुढे फिरु. तुम्हांला वाटताे ना किल्ला तुमचा आहे असू देत पण मनात आणलं ठरवलं तर आम्ही रायगड ताब्यात घेऊ शकताे असा इशारा युवराज संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati) यांनी किल्ले रायगडावरील राजसदर येथून पूरातत्व खात्याला दिला. दरम्यान महाराष्ट्र शासनाने किल्ला ताब्यात घ्यावा असे आवाहनही राजेंनी केले. शिवराज्यभिषेक दिन (Shivrajyabhishek Din) निमित्त रायगड येथे आयाेजिलेल्या कार्यक्रमात राजे बाेलत हाेते. (Maharashtra News)
स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आज तारखेनूसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक साेहळा (350th Shivrajyabhishek Sohala) माेठ्या उत्साहात साजरा होत आहे.
किल्ले रायगडाच्या (raigad) इतिहासातील रेकॉर्ड ब्रेक गर्दी आज पहावयास मिळाली. या कार्यक्रमासाठी अडीच लाखापेक्षा अधिक शिवभक्त किल्ले रायगड परिसरात दाखल झालेत. लाखाेंच्या संख्येने आलेल्या शिवभक्तांसाठी युवराज संभाजीराजे छत्रपतींनी जिल्हा प्रशासनासमवेत बैठक घेतली.
संभाजीराजे म्हणाले शिवराज्यभिषेक साजरा करताना पुर्वी हजार मावळे (स्वयंसेवक) हाेते. आज लाखाे मावळे साेहळ्यास उपस्थित राहिलेत याचा माेठा आनंद हाेत आहे. शिवराज्यभिषेक साेहळा जगात पाेहचावा या उद्देशाने हा साेहळा साजरा करण्यास प्रारंभ केला. त्याचे फलित चांगले हाेत आहे. ही ताकद तुमची आहे असे राजेंनी म्हटलं.
रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून चांगलं काम सुरु आहे. पूरातत्व खात्याचे सहकार्य मिळत आहे परंतु जास्त बाेललाे तर अडचणी उभ्या राहतील असे म्हणत राजे म्हणाले त्यांना वाटते त्यांचा किल्ला आहे.
ठीक आहे. जर ठरवलं आम्ही ताब्यात घ्यायचा तर आम्ही घेउ शकताे असे राजेंनी म्हणताच शिवप्रेमींनी टाळ्यांचा कडकडाट केला. राजे म्हणाले तुम्ही आवाज उठवा हा रायगड किल्ला महाराष्ट्र शासनाकडे द्या असे राजेंनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या लाेकप्रतिनिधींना आवाहन केले. आम्ही गड संवर्धानाचे काम करु की नाेकरशाह यांच्या मागे पुढे करु अशी खंत राजेंनी पूरातत्व खात्याच्या कारभारावरुन व्यक्त केली.
दरम्यान शिवप्रेमींनी गड उतरताना गडबड करुन नये असे आवाहन संभाजीराजे यांनी उपस्थितांना केले. ते म्हणाले गडाच्या खाली जवळपास ५० - ७५ हजार लोक आलेले आहेत. ते गडावर येणार आहेत. त्यांना देखील सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन राजेंनी केली.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.