Malvan : शिंदेंनी साधला नेम; आमदार वैभव नाईकांना माेठा धक्का

आता शिंदे- फडणवीस सरकारच्या गटाची ताकद मालवणात वाढेल अशी चर्चा आहे.
MLA Vaibhav Naik
MLA Vaibhav Naiksaam tv

- विनायक वंजारे

MLA Vaibhav Naik News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे आणि राजा गावकर यांनी मुंबईत शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

देवगड तालुक्यातील निष्ठवंत असलेले शिवसेनेचे सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर यांच्या दोन दिवसांपूर्वीच झालेल्या प्रवेशानंतर बबन शिंदे यांचा शिंदे गटातील प्रवेशाने शिवसेनेला तळकोकणातील बालेकिल्ल्यात बसलेला हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.

बबन शिंदे आणि राजा गावकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांना देखील हा मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

MLA Vaibhav Naik
Shivsena : आदित्य जी ! खासदार विनायक राऊत हे..., वाचा शिवसैनिकांची तक्रार

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेनेचे (shivsena) उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे आणी राजा गावकर यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश करत एकच खळबळ उडवून दिली आहे. शिंदे यांच्या प्रवेशा वेळीस आमदार रविंद्र फाटक, किरण उर्फ भैय्या सामंत, माजी खासदार सुधीर सावंत, कणकवलीचे नगरसेवक भूषण परूळेकर, सुनील पारकर, अमोल लोके यासह शिंदे गटातील अनेक पदाधिकारी व नेते उपस्थित होते.

Baban Shinde Enters In CM Eknath Shinde Shivsena Group
Baban Shinde Enters In CM Eknath Shinde Shivsena Groupsaam tv

आमदार वैभव नाईकांशी शिंदेंचे बिनसलं

बबन शिंदे हे मालवण तालुक्यातील असून ते शिवसेनेचे निष्ठावंत उपजिल्हाप्रमुख मानले जात होते. मालवण शहरातील नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर ते शिवसेनेशी एकनिष्ठ होते. आमदार वैभव नाईक (vaibhav naik) यांचे ते निष्ठावंत व खंदे समर्थक मानले जात. पण काही दिवसांपूर्वी आमदार वैभव नाईक यांच्याशी त्यांचं बिनसलं. पक्षात निर्णय घेताना आपल्याला डिवलले जात असल्याची तक्रार करत स्थानिक नेतृत्वावर ते नाराज होते.

मालवणची समीकरणं बदलतील

बबन शिंदे यांच्या प्रवेशाने अगामी मालवण नगरपंचायती निवडणूकीची आणी कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघातील निवडणूकीची समिकरणे बदलण्याची शक्यता आहे. बबन शिंदे यांचा दांडगा जनसंपर्क आणी चांगले नेटवर्क यामुळे शिंदे- फडणवीस सरकारच्या गटाची ताकद मालवणात चांगलीच वाढणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

MLA Vaibhav Naik
विजयदुर्ग किनार्‍यानजीक दुबईतील जहाज बुडालं; १९ जणांना वाचविण्यात यश

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com