शिवाजी महाराज, मुख्यमंत्र्यांचा फोटो लावला नाही म्हणून शिवसैनिकांकडून आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड

सध्या शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे दोन गट पडले असून आपापल्या नेत्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जात आहेत.
Shivsena Political Crisis
Shivsena Political Crisisविश्वभूषण लिमये

सोलापूर : शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant) यांच्या संस्थेच्या कॉलेज कार्यालयाची तोडफोडीचा शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे. बार्शीतील (Barshi) बीआयटी कॉलेजमध्ये सावंतांविरोधात घोषणाबाजी करत ऑफिसच्या खिडकीची किरकोळ तोडफोड शिवसैनिकांनी केली आहे.

सध्या शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (Eknath Shinde vs Uddhav Thackeray) समर्थक असे दोन गट पडले असून आपापल्या नेत्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जात आहेत. तर काही ठिकाणी बंडखोर आमदारांचा विरोध करण्यासाठी त्यांची कार्यालय देखील फोडली जात आहेत. शिवसैनिकांनी (Shivsainik) बंडखोर आमदारांची कार्यालय फोडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

हे देखील पाहा -

अशातच सध्या एकनाथ शिंदेसोबत असणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या संस्थेच्या कॉलेजच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे.

दरम्यान, सावंत यांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) फोटो का नाही लावला म्हणत शिवसैनिकांन ही तोडफोड केली आहे. शिवाय बार्शीतील शिवसेना शहर प्रमुख भाऊसाहेब आंधळकरांच्या कार्यकर्त्यांनी हा तोडफोडीचा प्रकार केला असून तोडफोडीच्या प्रयत्नात महिला कार्यकर्त्याही उपस्थित होत्या.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com