शिवसेनेच्या महाविराट सभेला पैसे देऊन गर्दी?; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

नितेश राणे यांनी 'विराट सभेचा फॉर्म्युला' या असं लिहत एक ट्विट केलं आहे.
शिवसेनेच्या महाविराट सभेला पैसे देऊन गर्दी?; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप
Nitesh Rane News, Aurangabad Shivsena Rally NewsNitesh Rane/@NiteshNRane

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी (8 मे) औरंगाबादमध्ये महाविराट सभा पार पडली. या सभेत लाखोंची गर्दी उसळली. सभेला जेवढी गर्दी जमली होती, तेवढी त्यापेक्षाही मोठी गर्दी जमविण्याची ताकद शिवसेनेकडे आहे, असा दावा शिवसेना नेत्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. मात्र, या सभेसाठी आलेली लोकं ही पैसे देऊन आणले असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. (Aurangabad Shivsena Rally News)

Nitesh Rane News, Aurangabad Shivsena Rally News
मोठी बातमी! राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट; ११ जुलैला हजर राहण्याचे आदेश

नितेश राणे यांनी 'विराट सभेचा फॉर्म्युला' या असं लिहत एक ट्विट केलं आहे. या ट्विट सोबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हातात नोट असलेला फोटोही त्यांनी पोस्ट केला आहे. या फोटोत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे लोकांना पैसे देत असताना दिसतात. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या सभेच्या दुसऱ्या दिवशी हे ट्विट केलं आहे.

दरम्यान, यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभाही औरंगाबादमधल्या याच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पार पडली होती. या सभेला सुद्धा लाखोंची गर्दी जमली होती. तेव्हा या सभेला मनसे नेत्यांनी पैसे देऊन लोकं आणल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. मला औरंगाबादमधील ग्रामीण भागातील लोकांचे तसे फोनही आले, असं वक्तव्य खैरे यांनी केलं होतं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com