नाचता येईना अंगण वाकडे, तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता येईनात; सुधीर मुनगंटीवारांचा टोला

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले आहे.
Sudhir Mungantiwar, Sanjay Raut
Sudhir Mungantiwar, Sanjay RautSaam Tv

चंद्रपूर: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे, त्यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बंडखोर आमदारांवर टीका करताना, दिल्लीच्या बापाच्या नावाने मत मागवून दाखवा, अंस म्हणाले. या टीकेला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रत्युत्तर दिले.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कोणी कुणाच्या बापाच्या नावाने मत मागितली हे सगळ्यांना माहीत आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा नुवडणुकीत २०१९ मध्ये कोणाच्या नावाने मत मागितले, हे सर्वाना माहीत आहे. जनतेने कोणाला मते द्यायचे हा जनतेचा अधिकार आहे. संजय राऊत रोज खालच्या शब्दात बोलून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली नेण्याचे काम करत असल्याचा आरोपही सुधीर मुंनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला.

Sudhir Mungantiwar, Sanjay Raut
मुंबई केंद्रशासीत करण्यासाठी शिवसेना संपवण्याचा डाव; संजय राऊतांचा हल्लाबोल

तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता आले नाही, आणि भारतीय जनता पार्टीवर आरोप करत आहात. नाचता येईना अंगण वाकडे अशी परिस्थिती शिवसेनेची आहे. तुमच्या अहंकाराला कंटाळून सेनेच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली असेलतर त्याचा दोष भाजपला देण्याची गरज नाही. यात निश्चितपणे चुकीच्या दिशेने जात असल्याचेही मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

सरकार जात असताना आता यांना आता काश्मिरी पंडीत आठवले, स्वातंत्रवीर सावरकर आठवतील आता एक एक सगळं आठवतील. देवेंद्र फडणीस दिल्लीला जात आहे, म्हणून त्यांच्यावर आरोप लागावे. हे सगळे आमदार निवडणून आलेले आहेत. हे सर्व आमदार त्या सभागृहाचे सदस्य आहेत, जिथे कायदे होते. त्यामुळे असे कोणी म्हणत असेल त्या वक्तव्य करणाऱ्यांची बौध्दिकता तपासलीच पाहिजे, असेही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

Sudhir Mungantiwar, Sanjay Raut
राजकारणातील सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचे मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे गटात सामील ?

'बंडोबा आमदारांना केंद्राकडून सुरक्षा पुरवली जात आहे, अशी माहिती समोर येत आहे. यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, यापूर्वी ही कंगना राणावत ज्या विषयाला त्या विहित सुद्धा केंद्राने सुरक्षा दिली होती, त्यामुळे या बंडखोर आमदारांना जर जीवाला धोका असेल आणि तशा पद्धतीची माहिती सरकारला मिळाली असेलतर ही केंद्र सरकारची नैतिक जबाबदारी आहे की त्यांना सुरक्षा पुरवली पाहिजे.

२४ ऑक्टोंबर २०१९ ला जी पत्रकार परिषद झाली, ती या शतकातील सर्वात मोठी बहीण आणि दाखवणारी पत्रकार परिषद ठरली पाठीत खंजीर खुपसणारे ही पत्रकार परिषद होती , भाजप शिवसेना हे सोबत लढत असताना त्यांच्या मनामध्ये सत्तेचा मोह निर्माण झाला त्यांना दिवसाही मुख्यमंत्र्याची खुर्ची दिसू लागली त्यामुळे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याची भूमिका घेतली, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा नाही तर अनेकदा सांगितलं होतं की ज्या दिवशी शिवसेना ही काँग्रेससोबत जाईल त्या दिवशी शिवसेना हा मी बंद करेल असे म्हटल्याची आठवण सुद्धा सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी करून दिलीत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com