शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उघड; माजी आमदाराच्या गटाने टाकला लेटर बाॅम्ब

माजी आमदार गाेपीकिशन बाेजाेरीया यांनी माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनासाेबत घेत पक्षाचे सचिव खा. अनिल देसाई यांची भेट घेतली.
Akola News
Akola Newsजयेश गावंडे

अकोला - शिवसेनेतील (Shivsena) गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. गटबाजी वाढतच असून, आजी-माजी आमदारांच्या दाेन्ही गटांनी पक्षाच्या सचिवांची भेट घेत एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्याराेप, दावे-प्रतीदावे केले. तर माजी आमदाराच्या लेटर बॉम्ब टाकत नवीन कार्यकारीणीची गठण करण्याची मागणी केली आहे तर विद्यमान आमदाराच्या गटाने यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात शिवसेनेचा विस्तार झाला नसल्याचा पटवार केला. एकूणच महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेतील गटबाजी संपुष्टात आणण्याचे आव्हाहन पक्ष श्रेष्टीसमोर आहे.

अकोला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख व माजी आमदार गाेपिकिशन बाजाेरीया यांचे दाेन स्वतंत्र गट असून, हे दाेन्ही गट एकमेकांवर कुरघाेडी करण्याची संधी साेडत नाहीत. डिसेंबर मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत गोपिकीशन बाजाेरीया यांचा झालेल्या पराभवानंतर तर खदखद वाढतच आहे. माजी आमदार गाेपीकिशन बाेजाेरीया यांनी माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनासाेबत घेत पक्षाचे सचिव खा. अनिल देसाई यांची भेट घेतली.

हे देखील पहा -

तसेच दुसऱ्या गटातील स्वत: आमदार तथा जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, निवासी उपजिल्हा प्रमुख गाेपाल दातकर आदिनीही सचिवांची भेट घेतली. माजी जिल्हाप्रमुख तथा अकाेल्याचे सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावे पक्षाच्या नेत्यांना पत्र सादर केले. जिजल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्या चुकीच्या कारभारामुळे अधिकारी धास्तावले आहेत. जिल्हा प्रमुखांचे भाजप-राकांॅ नेत्यांशी लागेबाधे आहेत. कार्यकारीणी बरखास्त करुन नवीन कार्यकारीणी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

जिल्ह्यात दाेन-तीन वर्षात काेणत्याही जनहिताच्या कार्यात शिवसेना सहभागी झाली नसून, शिवसैनिक पक्ष साेडत असल्याचा दावाही या गटाने केला. तर आमदार देशमुख यांच्याही गटानेही पलटवार केला. यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद निवडणूक मध्ये भाजपचे १३ सदस्य हाेते, मात्र आता ही संख्या ५ झाली असून, शिवसेनेच्या सदस्यांंची संख्या १३ झाली आहे. अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेतेही शिवसेनेची संख्या वाढल्याचा दावाही केला.

Akola News
Angadia Extortion Case: IPS सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल

मी जिल्हाप्रमुख हाेण्याच्यावेळी जिल्ह्यात विधानसभेचा एकही आमदार नव्हता. त्यापूर्वी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या अकाेट मतदारसंघातही सेनेचा पराभव झाला. मात्र मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिवसेना सदस्यांची संख्या वाढली असून, विधानसभेत एक आमदार आहे असेही आमदार देशमुख म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com