
औरंगाबाद: शिवसेनेची (Shivsena) मुंबईत १४ मे रोजी सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह राज ठाकरे यांच्यावरही टीका केली होती. याच सभेत उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे ८ जून रोजी सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. आता औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी शिवसेनेची जोरदार तयारी सुरू आहे. अगोदर बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील टीझर शेअर केला होता. आता औरंगाबादमध्ये पोस्टर लावले आहेत.
औरंगाबादमध्ये शिवसेनेच्यावतीने (Shivsena) ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत. या पोस्टरवर 'होय हे संभाजीनगरच...' हा मजकूर लिहिण्यात आला आहे. यामुळे ८ जून रोजी मुख्यमंत्री संभाजीनगरची अधिकृत घोषणा करणार की काय या चर्चा सुरू झाल्या आहेत. राज ठाकरे यांच्या सभेनंतर औरंगाबाद शहरात संभाजीनगरची चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
शिवसेनेच्या मुंबईतील सभेनंतर औरंगाबादच्या नावावरुन टीका सुरु झाल्या होत्या. महाविकास सरकार तुमचेच आहे, तर तुम्ही आतापर्यत औरंगाबादचे नाव संभाजीनगर ठेवायला पाहिजे होते, अशा टीका विरोधकांनी केल्या होत्या. यावर आता ८ जून रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रत्युत्तर देणार आहेत.
१४ मे रोजी शिवसेनेची (Shivsena) मुंबईतील बीकेसी मैदानात सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेल्या सभेत प्रत्युत्तर दिले होते. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ मे रोजी मुंबईत सभा घेऊन प्रत्युत्तर दिले होते. आता या टीकेला उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देतात याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
८ जूनला होणाऱ्या सभेचा टीझर शिवसेनेने आज लाँच केला आहे. औरंगाबाद येथे शिवसेना शाखेचा ३७ वा वर्धापन दिन सोहळा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा होणार आहे. काही दिवसापूर्वी भाजपने औरंगाबादमध्ये पाण्यासाठी ठाकरे सरकार विरोधात मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तर मनसेने सभा घेऊन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.
Edited By- Santosh Kanmuse
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.