सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा सुरुंग; 100 जणांचा प्रवेश

सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा सुरुंग; 100 जणांचा प्रवेश
shivsena bjp

रत्नागिरी : रिफायनरीच्या मुद्यावरून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच भाजपाने सुरुंग लावायला सुरुवात केली आहे. रिफायनरी समर्थनार्थ शिवसैनिकांचं शिवसेनेला 'सोडसत्र' सुरूच आहे. शिवसेनेच्या सागवे विभागातील जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांनी आज सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला. त्याशिवाय शिवसेनेच्या चार माजी शाखा प्रमुखांसह नाणार पंचक्रोशीतील100 हून अधिक सेनेच्या कार्यकर्त्यानी भाजपात प्रवेश केला. (shivsena-karykarta-entered-bjp-refinery-manda-shivalkar-sml80)

शिवसैनिकांप्रमाणे राजापूर तालुक्यातील संपूर्ण गोवळ ग्रामपंचायतीनं अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला. सरपंच आणि उपसरपंचासह गोवळ मधल्या ग्रामपंचायतीने भाजपात प्रवेश केला आहे.

जवळपास दीड वर्षांपुर्वी जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले होते. त्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली होती. मात्र तब्बल दीड वर्षानंतर रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेनेची भुमिका बदलत नाही हे पाहून त्यांनी भाजपात shivsena bjp प्रवेश केला.

shivsena bjp
पावसाचा काेकण रेल्वेला फटका; 'या' गाड्या झाल्या रद्द

काही दिवसांपुर्वी 150 कार्यकर्त्यांसह सेनेला जय महाराष्ट्र केला होता. आता पुन्हा 100 कार्यकर्त्यांनी सेनेला रामराम केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने धडक दिली आहे. त्यामुळे शिवसेनेला राजापूरमध्ये खिंडार पडू लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com