तेरड्याचा रंग तीन दिवस; अरविंद सावंतांची नारायण राणेंवर बोचरी टिका

नारायण राणे राणे नेहमीच संकुचित आणि कुत्सित या दोन उपाधी घेऊन वावरात असतात.
तेरड्याचा रंग तीन दिवस; अरविंद सावंतांची नारायण राणेंवर बोचरी टिका
तेरड्याचा रंग तीन दिवस अरविंद सावंतांची नारायण राणेंवर बोचरी टिका saam tv

मुंबई : '' उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री (Chief Minister) झाले तेव्हा नारायण राणेंनी (Narayan Rane) काय प्रतिक्रिया त्यांनी दिली याची त्यांनी आठवण करावी, कोणत्या शब्दात अभिनंदन केलं ते सांगावं. नारायण राणे राणे नेहमीच संकुचित आणि कुत्सित या दोन उपाधी घेऊन वावरात असतात. शेवटी तेरड्याचा रंग तीन दिवसच असतो, '' अशा शब्दांत शिवसेना नेते अरविंद सावंत (Shivsena Leader Arvind Sawant) यांनी नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे (Cabinet Minister Narayan Rane) यांच्यावर केली आहे.

तेरड्याचा रंग तीन दिवस अरविंद सावंतांची नारायण राणेंवर बोचरी टिका
नारायण राणेंचे राऊतांना प्रत्युत्तर; तेव्हा संजय राऊतांना कळेल..

उद्धव ठाकरेंचं मन ऐवढं मोठं नाही. मला मंत्रीपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले नाही,' अशी टीका आज सकाळी एका मुलाखतीत नारायण राणे यांनी केली होती. या टीकेला आता अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

बाळासाहेब ठाकरे देखील शरद पवारांवर टीका करायचे पण त्या टीकेला स्टेटस होतं. पण आता ज्या पद्धतीने भाषा वापरतात त्या बद्दल कुणालाही आदर आणि आनंदच वाटेल. मात्र नारायण राणे यांचं नशीब त्यांना 'अवजड' दिलं नाही.

केंद्रीय मंत्रीमंडळात काम करताना काय होतं हे आता त्यांना कळेल. त्या ठिकाणी सचिव नसतो त्यामुळे नक्कीच कळेल. केंद्रातल्या लोकांना डमी लोक हवे आहेत, शिवसेनेवर प्रहार करण्यासाठी त्यांचा वापर केला जाईल, असेही यावेळी अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

नारायण राणेंना सिंधुदुर्ग पलीकडे कोण विचारतो आणि त्यांचा मुलगा जिंकलाय नाहीतर सिंधुदुर्गात भगवा फडकला असता. ते शिवसेनेला बाजुला करू शकतात, हा त्यांच्या गैरसमज आहे. भाजपात प्रवेश मिळवताना उमेदवारी देणं, त्यांच्या मुलांना उमेदवारी देणं, शिवसैनिकांना पाडण्याचा प्रयत्न करणार, हे सगळं त्यांनी विधानसभेतही केलं. असेही यावेळी अरविंद सावंत यांनी नमूद केले आहे.

Edited By -Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com