शिवसेनेचे निवडणूक चिन्ह बंडखोरांना मिळणार नाही, नीलम गोऱ्हे यांचा इशारा

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे.
शिवसेनेचे निवडणूक चिन्ह बंडखोरांना मिळणार नाही, नीलम गोऱ्हे यांचा इशारा
Dr. Neelam gorhe Saam Tv

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून राज्याच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे. शिवसेनेचे चाळीस आमदार आणि अपक्ष १० असे एकूण ५० आमदार आमच्यासोबत आहेत, असा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. या सर्व घडामोडीनंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली असून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना नाव किंवा शिवसेनेचे चिन्ह मिळणार असे पसरवले जात आहे. मात्र, शिवसेनेची (Shivsena) घटना आहे. ती निवडणूक आयोगाच्या नुसार तयार केली आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह बंडखोरांना मिळणार नाही, असा इशारा नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटाला दिला आहे.

Dr. Neelam gorhe
हे सर्व भाजपनेच केलंय, त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल : उद्धव ठाकरे

यावेळी माध्यमांशी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, १० वी अनुसूची आहे. त्या प्रतीनुसार,ज्या लोकांनी विधानसभेमध्ये वेगळी भूमिका घेतली असेल तर ती अपात्र ठरते. आमदारकी रद्द व्हायची नसेल तर कुठल्या तरी गटात विलीन व्हावे लागेल. विलीन झाले नाहीत तर अपात्रतेपासून सुटका होणार नाही, पक्षांतर बंदीच्या कायद्यापासून सुटका व्हायची आहे, असे जर वाटत असेल तर त्यांनी कुठल्या तरी वेगळ्या पक्षात विलीन व्हावे, स्वतःचा गट स्थापन करावा लागेल.शिवसेना हे नाव मूळच्या पक्षाचं वापरता येणार नाही.

तसच यावेळी गोऱ्हे पुढे म्हणाल्या, भाजपत तरी विलीन व्हावे लागेल किंवा बच्चू कडू यांच्या प्रहार संगटनेत विलीन व्हावे लागेल. गैरसमज पसरवला जात आहे.शिवसेना नाव किंवा शिवसेनेचे चिन्ह मिळणार असे पसरवले जात आहे. शिवसेनेची घटना आहे.ती निवडणूक आयोगाच्या नुसार तयार केली आहे.विधीमंडळ पक्ष वेगळा आणि मूळ पक्ष वेगळा आहे. शिवसेनेचा पक्ष आहे, सहा टक्के मते मिळवावी लागली आहे.

Dr. Neelam gorhe
जिद्द असेल तर राहा, नाहीतर तुम्हीही सोडून जा; उद्धव ठाकरेंनी सर्वांना स्पष्टच सांगितलं

वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये जोपर्यंत ४ ते सहा टक्के मते मिळत नाहीत, तोपर्यंत चिन्ह गोठवणं किंवा मिळवणं असं करत नाहीत. त्यांना निवडणूक आयोगाकडे जायचं असेल तर ते जाऊ शकतात.बहुमत आमच्याकडे आहे.आमचे एकमत आहे.उद्धव ठाकरे यांनीच अध्यक्ष राहावं. ज्यांना भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील किंवा बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखालील राहायचं असेल तर त्यांनी पक्षाचा भगवा खांद्यावरून उतरवलेला आहे,असा त्याचा अर्थ होतो.आता सर्व निर्णय विधीमंडळात होणार आहेत.कायद्याप्रमाणं पाऊलं उचलली जातील, असाही इशारा गोऱ्हे यांनी दिला आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com