"शरद पवार आणि शिवसेना एकत्र येण्याची बाळासाहेबांची भूमिका होती"

केंद्रात भारतीय जनता पक्षाची सलग दोनवेळा सत्ता आल्यानंतर विरोधी पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केलीय.
"शरद पवार आणि शिवसेना एकत्र येण्याची बाळासाहेबांची भूमिका होती"
Balasaheb Thackeray and sharad pawarsaam tv

प्राची कुलकर्णी

पुणे : केंद्रात भारतीय जनता पक्षाची (BJP) सलग दोनवेळा सत्ता आल्यानंतर विरोधी पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. राष्ट्रवादी कॉंगेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोधी पक्षांची महाआघाडीची मोट बांधायला सुरुवात केली. देशातील सर्वच विरोधी पक्षांना एकत्र आणून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला जशाच तसे उत्तर देण्यासाठी पवार प्रयत्नशील आहेत. यासाठी देशभरात बैठकांचे आयोजन करुन विविध राजकीय विषयांवर खलबतंही झाली.

Balasaheb Thackeray and sharad pawar
'पंढरपूरचा विठोबा समोर असेल तर...'; नास्तिकतेच्या आरोपावर शरद पवारांनी दिलं उत्तर

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिलीय. शरद पवार यांनी देशाचं नेतृत्व करावे आणि आम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करू. देशातील विरोधी पक्षांना एकत्र करण्याची ताकद आणि क्षमता ही शरद पवारांकडे आहे, असा विश्वास ठाम विश्वास राऊतांना शरद पवार यांच्यावर आहे. तर शरद पवार आणि शिवसेना एकत्र येण्याची बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) भूमिका होती, असंही राऊतांनी स्पष्ट केलं.

पुण्यात राज्यसभेच्या निवडणुकीबाबत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, कोण कोणा बरोबर आहे, हे १० तारखेला कळेल. महाविकास आघाडी स्थापन करताना आमच्याकडे 170 चे बहुमत होते. राज्यसभा निवडणुकीतही तुम्हाला हा आकडा पाहायला मिळेल. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जर संख्याबळ असेल, तर आनंद आहे. ते विधानसभेच्या वेळीही असंच बोलले होते. पुष्पा सिनेमात आमचाच डायलॉग वापरलाय, मी कुठलाही डायलॉग वापरला नाही. मी टार्गेटेड असेल तर मला अटक करा. दुसऱ्या निरपराध लोकांना का त्रास देता ? असा सवाल उपस्थित करत विरोधकांचा राऊतांनी समाचार घेतला.

Balasaheb Thackeray and sharad pawar
राज्यसभा निवडणुका जिंकणारच, पण 'तो' मुद्दा गंभीर आहे, आदित्य ठाकरे म्हणाले....

शरद पवार आणि शिवसेना एकत्र येण्याची बाळासाहेबांची भूमिका होती. औरंगाबाद मध्ये ८ जून रोजी होणारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा अतिविराट होणार आहे. जसं प्रयागराज झालं, तसं औरंगाबादचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. संभाजीनगर नामकरण झालंय केंद्राकडे प्रस्ताव गेलाय, असंही राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com