''दुपारी झोपेतून उठणाऱ्यांनी सकाळी वाजणाऱ्या भोंग्याचा त्रास करून घेऊ नये''

''कमळाचं आणि भोंग्याचं नातं राज्यात सुरु आहे असे सुपरिबाज नेते अनेकांनी पाहिलेत किती आले किती गेले आणि झोपले.''
''दुपारी झोपेतून उठणाऱ्यांनी सकाळी वाजणाऱ्या भोंग्याचा त्रास करून घेऊ नये''
Subhash Desai- Raj ThackeraySaam TV

औरंगाबाद: आजची होणारी सभा ही सुपारी सभा आहे या सुपारी सभेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणाऱ्या 14 मे च्या सभेत समाचार घेतील असं औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी म्हटलं आहे ते औरंगाबादमधील (Aurangabad) शिवसैनिकांच्या प्रशिक्षण सभेत बोलत होते. लेका दुपारपर्यंत झोपून राहतोस अन पहाटच्या भोंगाच्या काय त्रास करून घेतोस असा टोमणाही देसाई यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला आहे. कमळाचं आणि भोंग्याचं नातं राज्यात सुरु आहे असे सुपरिबाज नेते अनेकांनी पाहिलेत किती आले किती गेले आणि झोपले अशी टीकाही त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. रंग बदलण्यात सरड्याचे कौशल्यही कमी पडेल एवढे रंग हे बदलतात असा टोला देखील त्यांनी देसाईंना हाणला आहे.

भगवी शॉल घेतली म्हणजे शिवसेना प्रमुखांची सर करता येत नाही. जे खेळ चाललेत त्याच्याकडे आपण उपेक्षेने पाहिल्या खेरीज काही करू शकत नाही असं सांगत विरोधकांच्या सर्व नकला ठीक आहे, मात्र शिवसेनाप्रमुखांचे विचार कॉपी करता येणार नाहीत अशी टीका त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे. यांचं घर गळकं आहे गळक्या घरात कोण जाऊ शकतं, अशीही टीका त्यांनी मनसेवर केली. उद्धव ठाकरे हे 14 मे रोजी मुंबईत तर 8 जून रोजी औरंगाबादमध्ये सभा घेऊन विरोधकांचा समाचार घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Subhash Desai- Raj Thackeray
देशातील कोरोना रुग्णांची वाढ म्हणजे चौथ्या लाटेची सुरुवात? ICMR म्हणाले...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होत आहे. पुण्यातून हनुमान जयंतीच्या दिवशी राज ठाकरेंनी दोन घोषणा केल्या त्यापैकी एक होती औरंगाबादची सभा. गुढीपाडव्याच्या सभेला राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेमध्ये राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. संबंध राज्यातून मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेला आलेले आहेत. आज राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.