आम्हाला मातोश्रीवरून आदेश मिळाले तर...; संजय राऊतांवर केलेल्या कारवाईनंतर सुषमा अंधारे भडकल्या

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
Sushma Andhare
Sushma Andhare Saam TV

मुंबई : पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ने संजय राऊतांना (sanjay raut) ताब्यात घेतलं आहे. ईडीने केलेल्या कारवाई विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या (Sushma Andhare) सुषमा अंधारे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. संजय राऊत यांच्यावर केलेली कारवाई सूडबुद्धीने झाली आहे. आम्हाला मातोश्रीवरून आदेश मिळाले तर महाराष्ट्राचे वातावरण काय होईल, हे सांगायची आम्हाला गरज नाही. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास म्हणून आणि न्यायालयीन लढा द्यायची तयारी ठेवली आहे, अशी प्रतिक्रिया अंधारे यांनी दिली आहे.

Sushma Andhare
सर्वात मोठी बातमी : शिवसेना खासदार संजय राऊत ईडीच्या ताब्यात

यावेळी माध्यमांशी बोलताना अंधारे म्हणाल्या, पक्षासाठी छातीचा कोट करून ईडी, सीबीआय या सगळ्यांशी लढणारे, मरण पत्करेन पण शरण पत्करणार नाही, हा लढाऊ स्वाभिमानी बाणा जपणारे संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेली कारवाई हे सूडबुद्धीने केली आहे. हे स्पष्टच आहे. ज्याप्रमाणे ते स्वतः लढत आहेत म्हणून त्यांना लक्ष करण्यात आलं. आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत म्हणून संजय राऊत यांनी सकाळपासून कारवाईला सहकार्य केलं. पण याचा अर्थ असा नाही की शिवसेना (shivsena) शांत बसणारी आहे.जर आम्हाला मातोश्रीवरून आदेश मिळाले तर महाराष्ट्राचे वातावरण काय होईल हे सांगायची आम्हाला गरज नाही.न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास म्हणून आणि न्यायालयीन लढा द्यायची तयारी ठेवली आहे. शिवसेना हा पक्ष संजय राऊत यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे.

Sushma Andhare
मोदी सरकारचे ब्लॅकमेलिंगचे काम लोकशाहीसाठी घातक, नाना पटोले यांची सडकून टीका

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय विभाग (ईडी)ने ताब्यात घेतलं आहे.आज सकाळी सात वाजताच्या सुमारास ईडीच्या पथकाने राऊत यांच्या घरी छापा टाकला होता. पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून संजय राऊतांची ९ तास चौकशी करण्यात आली. पत्राचाळ जमिन व्यवहारात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप राऊंतांवर करण्यात आला होता. राऊत ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करत नव्हते, त्यामुळे ईडीनं राऊतांना ताब्यात घेतलं.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com