Shivsena-BJP: मोदींचा फोटो लावल्यानेच 2019 निवडणुकीत शिवसेनेच्या जागा कमी आल्या, ठाकरे गटाच्या आमदाराचा दावा

मोदींचा फोटो वापरल्याने आमचं संख्याबळ कमी झाला असं नितीन देशमुख यांनी म्हटलं.
Nitin Deshmukh
Nitin DeshmukhSaam TV

अकोला : विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत मोदींचा फोटो वापरून शिवसेनेनं मतं मागितली आणि नंतर साथ सोडली, अशी टीका भाजपकडून सातत्याने होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इमेजचा फायदा शिवसेनेला झाला असाही दावा भाजपकडून केला जातो. मात्र शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी वेगळाच दावा केला. मोदींचा फोटो वापरल्याने आमचं संख्याबळ कमी झाला असं नितीन देशमुख यांनी म्हटलं.

Nitin Deshmukh
Gulabrao Patil : एकनाथ शिंदेच ज्योतिषाचं भविष्य सांगतील; गुलाबराव पाटील काय म्हणाले, वाचा...

2019च्या विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात निवडणूक प्रचारासाठी कधीही मोदीचा फोटो वापरला गेला नाही. मात्र शिवसेना-भाजप युती असल्याने त्यावळी शिवसेनेने मोदींचा फोटो प्रचारात वापरला होता. त्यादरम्यान निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरल्याने शिवसेनेच्या जागा कमी झाल्या. म्हणजे मोदींचा फोटो लावल्याने आमचं संख्याबळ कमी झालं. (Latest Marathi News)

मोदींचा फोटो लावल्यानेच आमचं जनमत कमी झालं. 2014च्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढली, त्यावेळी कुठेही मोदींचा फोटा वापरला नाही. त्यावेळी शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले होते, असं नितीन देशमुख यांनी म्हटलं.

भावना गवळी दिसतील तेव्हा गद्दारचे नारे लावणार

हो आम्ही गद्दारचे नारे लावले. यापुढेही जेव्हा भावना गवळी दिसतील तेव्हा गद्दारचे नारे लावू, असा इशारा नितीन देशमुख यांनी भावना गवळी यांना दिला आहे. आमदार नितीन देशमुख यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर आज अकोल्यातील विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन भावना गवळी यांच्यावर त्यांनी आरोप केले. आम्ही तुम्हाला गद्दार म्हटले तर अश्लील चाळे केल्याची तुम्ही फिर्याद देता. उद्या शिवसेनेच्या महिला भगिनी तुम्हाला गद्दार म्हणतील त्यावेळी तुम्ही ही फिर्याद द्याल का? असा सवाल यावेळी नितीन देशमुख यांनी उपस्थित केला आहे. माझ्या पत्नीने गद्दारी केली असती तर तिलाही आम्ही गद्दार म्हटलं असतं, असंही निती देशमुख म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com