कोणाला घाबरवताय, तुमच्या असल्या धमक्यांना भीक घालत नाही - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर तोफ डागली आहे.
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath Shinde Saam Tv

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात राजकीय मैदानात जोरदार संघर्ष सुरु आहे. शिवसेनेने बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यासह १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर तोफ डागली आहे. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत.कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे, असं ट्विट करुन शिंदे यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
बंडखोर आमदारांबाबत शिवसेनेच्या बैठकीत चर्चा नाही, CM ठाकरेंनी आखली नवी रणनीती

ट्विटरवर एकनाथ शिंदे म्हणाले, कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. शिवसेनेचे नाराज मंत्री आणि नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांचे समर्थक असलेल्या जवळपास ४० आमदारांसोबत बंड करुन शिवसेनेची कोंडी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात राजकीय मैदानात जोरदार संघर्ष सुरु आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com