'ज्याने स्वराज्याचा द्रोह केला अशा...'; एकनाथ शिंदे यांची ओवेसींवर जोरदार टीका

Eknath shinde News : अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानं अनेक राजकीय पक्षातून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.
'ज्याने स्वराज्याचा द्रोह केला अशा...'; एकनाथ शिंदे यांची ओवेसींवर जोरदार टीका
shivsena minister eknath shinde has criticized akbaruddin owaisiSaam Tv

डोंबिवली : एआयएमचे (AIMIM) नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानं अनेक राजकीय पक्षातून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेचे जेष्ठ नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'देशद्रोही औरंगजेब ज्याने स्वराज्याचा द्रोह केला अशा औरंगजेबाच्या कबरीवर ओवेसीने जे काही केलं त्याचा मी निषेध करतो, अशा शब्दात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ओवेसींवर टीका केली आहे. (shivsena minister eknath shinde has criticized akbaruddin owaisi )

हे देखील पाहा -

मंत्री शिंदे शुक्रवारी प्रगती कॉलेजच्या रौप्य महोत्सव निमित्त आयोजित वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांचा सन्मान सोहळ्याला डोंबिवलीत आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू होता, त्याने हिंदूंच्या देवस्थानाची, मंदिरांची नासधूस केली. खरं म्हणजे अशा देशद्रोही औरंगजेब ज्याने स्वराज्याचा द्रोह केला अशा औरंगजेबाच्या कबरीवर ओवेसीने जे काही केलं त्याचा मी निषेध करतो, अशी टीका शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ओवेसींवर केली. पुढे एकनाथ शिंदे यांनी 'खासदार श्रीकांत शिंदे यांची कल्याण शीळ रोडला संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचं नाव देन्याची मागणी होती ती तातडीने  पूर्ण करणार, असल्याचे यावेळी सांगितले. तसंच याबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचेही सांगितलं. 'जिल्ह्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाई बाबत एमआयडीसी आणि जलसंपदाच्या मंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेतली जाईल आणि त्यामधून पाणी प्रश्न सोडवला जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

shivsena minister eknath shinde has criticized akbaruddin owaisi
संभाजीराजेंचा अवमान; तहसीलदारांसह सहायक धार्मिक व्यवस्थापकांना कारणे दाखवा नाेटीस

दरम्यान, ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळ प्रगती कॉलेजच्या रौप्य महोत्सवा निमित्त वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांचा सन्मान सोहळा डोंबिवली सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे ,केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील ,खासदार श्रीकांत शिंदे ,आमदार गणपत गायकवाड,आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजू पाटील उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा स्तुत्य कार्यक्रम असल्याचे सांगितले .पुढे मंत्री शिंदे म्हणाले, 'ठाणे जिल्ह्यात उत्तम कीर्तनकार आहेत. कीर्तनकार होणं सोपं नाही.समाज प्रबोधनाचं ,समाजाला दिशा देण्याचे काम कीर्तनकार करत असतात. अन्यायाविरोधात कीर्तनाच्या माध्यमातून वार करण्याचं काम वारकरी करत असतात. ठाण्यात वारकरी भवन उभारण्यात आलं आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मागणीनुसार दिव्या मध्ये बेतवडा येथे आगरी कोळी वारकरी भवन निधी मंजूर करण्यात आला आहे. येथील वारकऱ्यांची संत सावळाराम वारकरी भवन उभारण्याची मागणी आहे. त्यासाठी  जागा उपलब्ध करून घ्या, निधी मी देईन, असं आश्वासन शिंदे यांनी दिलं. शेवटी बोलताना आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर हा सिनेमा पाहावा, अस आवाहन वारकऱ्यांना त्यांनी केलं

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.