जो जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश होईल - गुलाबराव पाटील

शिवसेनेनं शिवसंपर्क अभियनाची सभा मुंबईच्या बीकेसी मैदानात घेतली आहे.
जो जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश होईल - गुलाबराव पाटील
Gulabrao patilSaam tv

रश्मी पुराणीक

मुंबई : शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून शिवसंपर्क अभियनाची (Shivsena rally) सभा मुंबईच्या बीकेसी मैदानात घेतली आहे. विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेण्यासाठी शिवसेनेनं पोस्टर आणि व्हिडिओ टीझरद्वारे विरोधकांवर तोफ डागली आहे. शिवसेनेकडून आक्रमक टीझरही प्रदर्शीत करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर हजारोंच्या संख्येत शिवसैनिक (Shivsena) बीकेसी मैदानावर पोहोचले आहेत. शिवसेनेनं शिवाजी पार्क ते बीकेसी मैदानापर्यंत बाईक रॅलीही काढली आहे. बाईक रॅलीत हनुमान रथ सजवण्यात आला असून हिंदुत्व काय असतं हे शिवसैनिक रॅलीच्या माध्यमातून दाखवत आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या महासभेत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांनी विरोधकांवर सडकून टीका केलीय. जो जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश होईल. नामर्दांना जिथे स्थान नाही अशी शिवसेना संघटना आहे. असं म्हणत पाटील यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे.

Gulabrao patil
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांनी दिला राजीनामा; त्रिपुरात भाजपने केले बदल

शिवसेनेच्या मुंबईतील महासभेत पाटील शिवसैनिकांना संबोधीत करताना म्हणाले, जो जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश होईल. नामर्दांना जिथे स्थान नाही अशी शिवसेना संघटना आहे. शिवसेना प्रमुखांच्या आदेशानेच शिवसैनिक काम करतात.पापी लोकांची कंबर आम्ही मोडली. आता काही जण शिवसेना संपवायला निघाली आहेत. त्यांना एवढचं सांगतो शिवसेनेला तुम्ही संपवू शकत नाही.

पाटील शिवसेनेच्या विराट सभेत बोलताना पुढे म्हणाले, गल्ली गल्लीत जाऊन आम्हाला हिंदुत्व सांगतात. गुलाबराव पाटील कशासाठी जेलमध्ये गेले हे रेकॉर्ड पोलीस स्टेशन मध्ये आहेत. शिवसेनेचा जो शाखा प्रमुख तुरुंगात गेला नाही, तो शिवसैनिक नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकरी पाठीचा कणा आहे. शिवसैनिकांच्या निष्ठेबद्दलही वक्तव्य केलं. गॅस महाग झाला आहे यावर कोणी बोलत नाही.सगळे तोतरे तात्रे बोलतात.कोणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यावं लागेल. अशा शब्दातं पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

Edited By- Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.