Maharashtra Politics : 'गोव्यात टेबलावर नाचणारे लोकप्रतिनिधी, तुमचा चेहरा होऊ शकतात का ?'

'शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून सरकार स्थापन केलं. पण गद्दारी करणाऱ्या या सर्वांना सगळं दिलं. काही कमी केलं नाही. गोव्यात टेबलावर नाचणारे लोकप्रतिनिधी, तुमचा चेहरा होऊ शकतात का ? असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
shivsena rebel mla
shivsena rebel mla ANI

मुंबई : शिवसेनेतील (ShivSena) बंडानंतर माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. आज आमदार ठाकरे यांचा कुडाळ येथे शिवसंवाद यात्रा सुरू आहे. या दौऱ्यात बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांसह भाजपवर टीका केली आहे. 'शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून सरकार स्थापन केलं. पण गद्दारी करणाऱ्या या सर्वांना सगळं दिलं. काही कमी केलं नाही. गोव्यात टेबलावर नाचणारे लोकप्रतिनिधी, तुमचा चेहरा होऊ शकतात का ? असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

shivsena rebel mla
मोठी बातमी! संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या; ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

आदित्य ठाकरे कुडाळमधील शिवसंवाद यात्रेत बंडखोर आमदारांवर जोरदार बरसले. आदित्य ठाकरे म्हणाले,'शिवसेनेचे उमेदवार म्हणून मतदारांना त्यांना डोक्यावर उचलून घेतलं, त्यांच्यावर उपकार करूनही पाठीत खंजीर खुपसला ? वार करायचा होता तर छातीवर करायचा होता. उद्धव ठाकरे हे आजारी असताना खंजीर खुपसला हे दु:ख आहे. मला कुणाची लायकी काढायची नाही. कारण माझं वय काढतील'.

या दौऱ्यात बंडखोर आमदारांना आवाहन देखील आदित्य ठाकरे यांनी केलं. 'तुम्हाला रहायचं आहे, तिकडेच राहा. लाज बाळगा. पण ज्या गद्दारांना थोडीतरी लाज असेल त्यांनी परत यावे आमचे मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत . सत्य जिंकतं की सत्ता जिंकते हे मला पहायचं आहे. एका गद्दाराचा मला मेसेज आला, गद्दार म्हणू नका विश्वासघातकी बोला. हे गद्दार म्हणजे गद्दारच. जेव्हा माणूस आजारी होता, हलू शकत नव्हता, त्यावेळी गद्दारांनी हे कृत्य केलं. त्यावेळी गद्दारांचे नेते पक्ष फोडत होते. वाईट काळात हे ४० गद्दार आम्हाला सांभाळतील अशी आशा होती. हे गद्दार आमचे नाही, घरातल्यांचे नाही झाले, ते तुमचे काय होणार ? अशी जोरदार टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

shivsena rebel mla
केदार दिघेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उत्तर दिलं, उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

बाळासाहेबांची आठवण काढत ठाकरे म्हणाले, 'आम्ही पुन्हा पुन्हा चूक करू, पण शिवसैनिकांना प्रेम देऊ. हे झुकले, त्यांनी सर्व विकलं, पण शिवसेना नावावर चालते. पैसा येतो-जातो, पुन्हा येतो हे ब्रीदवाक्य माझ्या पंजोबांनी बाळासाहेबांना दिलं. त्यांनी आम्हाला दिलं, ते आम्ही पुढे नेऊ'. तर या दु:खातून,गद्दारीतून पुढे जायचं असेल, तर मला तुमची साथ हवी, आशिर्वाद हवा म्हणत आदित्य ठाकरे यांनी कोकणवासीयांना साद घातली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com