Akola : वसीम चौधरी प्रकरणावरुन पालकमंत्र्यांसमोर सेना आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

Wasim Chaudhary Coaching Classes Akola News : याच क्लासेसच्या संचालक असलेल्या वसीम चौधरी याच्यावर अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Wasim Chaudhary Coaching Classes Akola News
Wasim Chaudhary Coaching Classes Akola Newsजयेश गावंडे

अकोला : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे (Molestation) करून शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या चौधरी कोचिंग क्लासच्या वसीम चौधरीचा (Wasim Chaudhary Coaching Classes Akola News) मुद्दा पालकमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या सभेत चांगलाच गाजला. या सभेत शिवसेना आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) आणि जिल्हाधिकारी निमा अरोरा (Nima Arora) यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. (ShivSena MLA and District Collector quarreled before Bachchu Kadu over Wasim Chaudhary case in Akola)

हे देखील पाहा -

मोफत शिकवणीचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने चौधरी कोचिंग क्लासच्या माध्यमातून राबविला होता. मात्र या एकाच क्लासला प्रशासनाने झुकते माप का दिले? अन्य क्लासलाही सहभागी का करून घेतले नाही? सरकारी यंत्रणेला वेठीस का धरण्यात आले? असे सवाल करीत जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी खुलासा करावा आणि नागरिकांना आवाहन करावे, अशी मागणी सेना आमदार नितीन देशमुख यांनी केली. मात्र याला जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी नकार दिला. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि आमदार नितीन देशमुख यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. बऱ्याच वेळ चर्चा रंगल्यावर पालकमंत्री बच्चू कडू यांनी या प्रकरणी ऍक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश दिले.

नेमकं काय आहे प्रकरण?

मोफत शिकवणीचा उपक्रम जिल्हा प्रशासनाकडून चौधरी कोचिंग क्लासच्या माध्यमातून राबविण्यात आणि याला 'सुपर ७५' या नावाने ओळखले जाऊ लागले. यासाठी चौधरीच्या कोचिंग क्लासकडे नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असल्याचा आरोप लोकप्रतिनिधी यांनी केला आहे. दरम्यान याच क्लासेसच्या संचालक असलेल्या वसीम चौधरी याच्यावर अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वसीम चौधरी सध्या जेलची हवा खात आहे. दरम्यान आजच्या सभेत आमदार देशमुख म्हणाले की, या क्लासबाबत प्रशासनाने आवाहन केल्याने लोकांनी नोंदणी केली. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी क्लासमध्ये जाऊ नये, असे आवाहन करावे, असे आमदार देशमुख म्हणाले. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नकार दिला. त्यामुळे आमदार देशमुख यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

Wasim Chaudhary Coaching Classes Akola News
Ambernath : ऑफिसला जायला निघालेल्या तरुणीचा विनयभंग; विकृताला पोलिसांनी केली अटक

आमदार देशमुख यांनी थेट चौकशीची मागणी केली. जिल्हाधिकारी आणि आमदार देशमुख यांच्यात खडाजंगी झाली. जिल्हाधिकारी यांनीही करा माझी चौकशी असे म्हणाल्या. ही मग्रुगी असल्याची टीका आमदार देशमुख यांनी केली. तर आमदार मिटकरी यांनी घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून याप्रकरणी विधी मंडळात लक्षवेधी लावण्यात येईल असे म्हटले. तर आमदार सावरकर यांनीही प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com