
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर नाराज झालेले शिवसेना नेते तथा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेच्या अनेक आमदारांना घेऊन नॉट रीचेबल आहेत. एकनाथ शिंदे हे थेट गुजरातमधील सुरतला गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख सुद्धा नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. इकडे नितीन देशमुख नॉट रिचेबल होताच त्यांच्या पत्नीने ते हरवले असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. (Shivsena MLA Nitin Deshmukh Latest News)
नितीन देशमुख अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गुजरातमधील सूरत येथे गेले असल्याची माहिती आहे. अशातच देशमुख हरवले असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने अकोला पोलिसांत दाखल केली आहे. त्यामुळे आता अकोला पोलीस हे नितीन देशमुख यांची शोधाशोध सुरू करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विशेष बाब म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले काही आमदारांना जबरदस्ती उचलून नेल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे आता या आमदारांना माघारी आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल गृह खात्याकडून घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे भाजपातप्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. मोठी बाब म्हणजे एकनाथ शिंदे एकटे गेले नसून त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय असलेले तब्बल १७ आमदार आणि पदाधिकारीही सुरतमधील एका हॉटेलात थांबले असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.