समृद्धी महामार्गाच्या कामाला विरोध; शिवसेना आमदारच मुख्यमंत्र्यांविरोधात मैदानात

शिवसेना आमदार संजय रायमूलकर यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे.
Shivsena MLA Sanjay Raimulkar
Shivsena MLA Sanjay RaimulkarSaam TV

बुलडाणा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पायलट प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गावरील कामाच्या विरोधात आता शिवसेनेचे एक आमदारचं मैदानात उतरले आहेत. आज शिवसेना आमदार संजय रायमूलकर यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. समृद्धी महामार्गाच्या कामामुळे मेहकर , लोणार तालुक्यातील जवळपास 100 किमी रस्ते खराब झाले आहेत, ते तात्काळ दुरुस्ती करून द्या, या मागणीसाठी आमदार संजय रायमूलकर हे मैदानात उतरले आहेत. (Shivsena MLA Sanjay Raimulkar Agitate Against Samruddhi Mahamarg)

Shivsena MLA Sanjay Raimulkar
मोठी बातमी! शिवसेनेची ऑफर संभाजीराजेंनी धुडकावली?; मुख्यमंत्र्यांसोबतची भेट रद्द

समृद्धी महामार्गाच्या कामामुळं शेतकऱ्यांचे पिढ्यानपिढ्या असलेले पाण्याच्या वहिवाटीचे मार्ग, शेतात जाण्याचे रस्ते पूर्णतः बदलले आहेत. महामार्गाच्या खाली ठेवलेलं अंडरपास हे अतिशय छोटे आहेत. त्यामुळे त्यातून बैलगाडी सुद्धा जात नसल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी अर्धा किलोमीटर फेऱ्याने जावं लागत असल्याची तक्रार आमदार संजय रायमूलकर यांनी केली आहे.

समृद्धी महामार्गाच्या कामामुळे मेहकर , लोणार तालुक्यातील जवळपास 100 किमी रस्ते खराब झाले आहेत, ते तात्काळ दुरुस्ती करून द्यावे, याशिवाय पालखी मार्ग तात्काळ दुरुस्ती करून द्यावां, शेतकऱ्यांना रस्ते करून द्यावे, अशी मागणी आमदार संजय रायमूलकर यांनी केली आहे. इतकंच नाही तर, त्यांच्यासोबत असंख्य शेतकरी देखील या आंदोलनात उतरले असून कामाला तात्काळ सुरुवात करा, तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही अशी भूमिका रायमूलकर यांनी घेतली आहे.

मेहकर येथील MSRDC च्या कार्यालयासमोर हे आंदोलन होत आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा पायलट प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील कामाच्या विरोधातच शिवसेनेच्या आमदाराच हे आंदोलन असल्यानं आता शिवसेना यात काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com