Sanjay Shirsat News: आता तर हद्दच झाली राव! आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाचा ट्रॅक्टर चोरीला

MLA Sanjay Shirsat’s Tractor was Stolen: सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Sanjay Shirsat
Sanjay Shirsatsaam tv

Satara News: शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांच्या मुलीच्या मालकीचा पाच लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर चोरट्यांनी सातारा परिसरातून लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी सातारा पोलीस (Satara Police) ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. माजी नगरसेवक सिद्धांत संजय शिरसाट यांनी त्यांच्या व्यवसायासाठी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे. (Latest Marathi News)

Sanjay Shirsat
Sharad Pawar Solapur: शरद पवार पुन्हा 'पावसात'; सहकाऱ्याला दिलेला शब्द पाळला अन् भर पावसात लावली लग्न समारंभाला हजेरी (पाहा व्हिडिओ)

हा ट्रॅक्टर त्यांनी सातारा (Satara) परिसरातील तंत्रज्ञनगर येथे उभा करून ठेवला होता. हा ट्रॅक्टर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. यानंतर त्यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या प्रकरणी पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस खबरींच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरु आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस (Police) करत आहेत. (Maharashtra News)

Sanjay Shirsat
Chandrapur News : अप्रमाणित कृषी निविष्ठेबाबतचा खटला त्वरित निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करा : मुनगंटीवार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रॅक्टर ३ मे रोजी सायंकाळी सातारा परिसरातील तंत्रज्ञनगर येथे उभा करून ठेवला होता. हा ट्रॅक्टर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. यानंतर त्यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस हवालदार धुळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com