Santosh Bangar: आमदार संतोष बांगर यांची तरुणाला अश्लिल शिवीगाळ; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यावर काही करवाई करणार का? की कौतुकाने पाठ थोपटणार, असा सवाल अयोध्या पोळ यांनी उपस्थित केला आहे..
santosh bangar
santosh bangar saam tv

Santosh Bangar Viral Audio Clip: शिंदे गटाचे नेते आणि हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे (Santosh Bangar) वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा विज वितरण अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या व्हायरल क्लिपवरुन चांगलेच राजकारण तापले होते. आता पुन्हा एकदा आमदार बांगर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये संतोष बांगर अश्लिल शिविगाळ करताना दिसत आहेत. ही ऑडिओ क्लिप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या अयोध्या पोळ पाटील यांनी ट्विटरवर शेअर करत संताप व्यक्त केला आहे..

santosh bangar
Political News : भर चौकात महिलेला मारहाण, सुप्रिया सुळे संतापल्या; महिला सुरक्षित आहे का? म्हणत साधला सरकारवर निशाणा

याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील चिखली गावच्या तरुणाला शिंदे गटाचे आमदार सतोष बांगर हे अश्लील भाषेत शिवीगाळ करत असल्याचा एक ऑडियो सध्या व्हायरल होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या तरुणाने आमदार बांगर यांना फोन करून फायनान्स कंपनीवाले आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार केली. मात्र आमदार बांगर यांनी या तरुणाला बोलताना आमदार बांगर हे मयत झाले आहेत त्यांना फोन करू नका असे सांगितले, ज्यामुळे त्यांच्यातील वादाला सुरूवात झाली.

santosh bangar
Congress News : काँग्रेसच्या माजी आमदारावर दराेड्याचा गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं प्रकरण

त्यानंतर या तरुणाचा देखील पारा चढला आणि या तरुणाने आमदार संतोष बांगर यांना शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर आमदार बांगर हे देखील संतापले आणि त्यांनी या तरुणाला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. धक्कादायक म्हणजे राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नावाचा उल्लेख करत आमदार बांगर यांनी या तरुणाला शिवीगाळ केल्याचे ऑडिओ क्लिप मध्ये दिसत आहे.

दरम्यान ही ऑडिओ क्लिप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पोळ पाटील यांनी ट्विटरवर पोस्ट करत आमदार बांगर यांच्यावर टीका केली आहे. "शी असला गधळ, गच्च्याळ, संस्कारहीन अन जातीवरुन शिवीगाळ करणारा संविधानीक पदावर बसलेला लोकप्रतिनिधी आहे आणि आपले मुख्यमंत्री अन उपमुख्यमंत्री यांची पाठ थोपटतात म्हणे?मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यावर काही करवाई करणार का? की कौतुकाने पाठ थोपटणार," असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मात्र ही क्लिप आमदार बांगर यांचीच आहे का व क्लिप मधील आवाज त्यांचाच आहे का याबाबत साम टीव्हीने अद्यापपु ष्टी केली नाही, सध्या ही क्लिप राज्यभर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com