
अमर घटारे
अमरावती : विधान परिषद निवडणुकीच्या (Election) दुसऱ्याच दिवशी शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्याचे दिसत आहे. काल (मंगळवार) शिवसेनेचे नाराज नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करून शिवसेना आमदारांच्या एका गटासह सूरत गाठले होते. यामध्ये शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचाही सामावेश होता. मात्र, आमदार नितीन देखमुख गुवाहटीवरून आता अमरावतीमध्ये परतले आहेत. अमरावतीत परतल्यावर नांदगाव पेठ टोल नाक्यावर शिवसेनेकडून आमदार देशमुख यांचं स्वागत करण्यात आलं आहे. आमदार नितीन देशमुख अमरावतीत परतल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या शिवसेना आमदारांनी परत यावं, असं आवाहन आमदार नितीन देशमुख यांनी केलं आहे. ( Maharashtra Political Crisis News In Marathi )
एकनाथ शिंदेसहित शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्याने पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत शिवसेनेचे दोन आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटातून परतले आहेत. बाळापूरचे आमदार नितीन देखमुख आता अमरावतीत आले आहेत. यावेळी अमरावतीच्या शिवसैनिकांनी आमदार देशमुख यांच्या समर्थनार्थ अमरावतीच्या शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
अमरावतीत आमदार देशमुख परतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आमदार देशमुख म्हणाले, 'मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे की, मी त्यांच्या पाठीशी आहे'. पुढे त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या शिवसेना आमदारांनी परत यावं असं आवाहन आमदार नितीन देशमुख यांनी केलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना जनता मतदारसंघात जागा दाखवणार अशी तीव्र प्रतिक्रिया देखील आमदार देशमुख यांनी दिली.
मला हार्ट अॅटॅक आलाच नाही, घात करण्याचा डाव : नितीन देशमुख
शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाविरोधात बंड करून सुरतला गेलेल्या एका शिवसेना आमदार नितीन देशमुख यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली होती. सूरतमध्ये दाखल झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास आमदार नितीन देशमुख यांच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर गंभीर अवस्थेत आमदार देशमुख यांनी सूरत येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. (Nitin Deshmukh Marathi News)
नितीन देशमुख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली होती. आमदार देशमुख यांना रुग्णालयात दाखल करताच या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र आता आमदार नितीन देशमुख हे नागपुरात दाखल झाले असून त्यांनी आपल्याला कोणताही हार्ट अॅटॅक आला नसल्याचं पत्रकारांना सांगितलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.