राज यांच्या सभेपूर्वी औरंगाबादेत मनसे-शिवसेना पोस्टर वॉर, चौका-चौकात बॅनर

Shivsena MNS Poster War: राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये शिवसेना-मनसेत पोस्टर वॉर बघायला मिळाला.
राज यांच्या सभेपूर्वी औरंगाबादेत मनसे-शिवसेना पोस्टर वॉर, चौका-चौकात बॅनर
Shivsena MNS Poster WarSaam TV

औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची उद्या १ मे रोजी औरंगाबाद (Aurangabad) शहरात जाहीर सभा होणार आहे. या सभेची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. आता काही तासांतच राज ठाकरे हे औरंगाबाद शहरात प्रवेश करणार आहे. अशातच राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये शिवसेना-मनसेत पोस्टर (Shivsena MNS Poster War)वॉर बघायला मिळाला आहे. (Shivsena MNS Poster War Before Raj Thackeray Rally In Aurangabad)

Shivsena MNS Poster War
'संभाजीनगर शिवसेनेचा गढ होता पण..' नितीन सरदेसाईंनी शिवसेनेला डिवचलं

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद शहरात प्रवेशापूर्वी शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी पोस्टर((Shivsena Poster) लावण्यात आले आहे. त्याचबरोबर शिवसेना आमदार आणि प्रवक्ते अंबादास दानवे (MLA Ambadas Danave) यांनी एक फेसबुक पोस्ट सुद्धा केली आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये दानवेंनी 'हे बाळासाहेबांचं संभाजीनगर' (Balasaheb Thackeray) असं कॅप्शन देत बाळासाहेबांच्या भाषणाचा फोटो पोस्ट केलाय.

इतकंच नाही तर, आज रात्री राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहे, त्या हॉटेलच्या काही अंतर परिसरात शिवसेनाच्या वतीने होर्डिंग लावण्यात आल्या आहेत. या होर्डिंगवर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या सम दुसरे होणे नाही, असे बॅनर लावण्यात आले आहे. या पोस्टरच्या माध्यमातून मनसेने किती ताकद लावली तरीही औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे, असे दर्शविण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेवरून पोस्टर वॉर दिसून येतंय.

Shivsena vs MNS
Shivsena vs MNSAmbadas Danve_Facebook

राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांच्या अटी

– ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे

– लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी

– इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

– सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही

– 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये

– व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी

– सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन टाळावे

– सभेच्या आधी व नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही

– सभेत येणाऱ्या लोकांनी घोषणा देऊ नयेत

– सामाजिक सलोखा बिघडेल असे वर्तन करण्यात येऊ नये

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.