
मुंबई : आगामी होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर सभांच्या माध्यमातून सर्वच पक्ष राजकीय कुरघोड्या करत आहेत.काही दिवसांपूर्वी भाजपने मुंबईच्या सोमय्या मैदानात बूस्टर सभा घेत शिवसेनेची 'पोलखोल' केली होती. भाजपने मविआ सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला होता.तसंच बाबरी मशिदीच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही (Raj Thackeray)मनसे मेळाव्यात मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना येत्या १४ मे ला जाहीर सभा घेवून विरोधकांचा समाचार घेणार आहे.शिवसेनेच्या सभेविषयी खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेची सभा येत्या १४ मे ला होणार आहे. या सभेची वाट फक्त राज्य नाही तर देश पाहतोय. त्यामुळे शिवसेनेच्या सभेत विरोधकांचा नुसता समाचारच नाही घेणार, तर त्यांना विचारही दिला जाईल. अशी खोचक टीका सावंत यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांवर केली आहे.
सावंत माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, नवंहिंदुत्व हा शब्दच मुळात उद्धव ठाकरे यांचा आहे. शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्री काय विचार मांडतील, याकडे संगळ्यांचं लक्ष लागलं आहे.नव्या विचारवंतांनी प्रदुषण केलं आहे. त्यांचा समाचार घेणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही मास्क काढून बोलणार असल्याचा इशारा विरोधकांना दिला आहे. मधल्या काळात अनेकांनी सभा घेतल्या. त्यानंतर असली-नकली काय हे प्रत्येकाने आपल्या मनाला विचारलं पाहिजे.
शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाची भूमिका मांडताना म्हटलं की,हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. पण काहींना ते कळत नाही. उशिरा कळंतं.कळतं पण वळत नाही. महाराष्ट्र,देश सध्या अनेक समस्यांना तोंड देतोय,तेव्हा त्याला भटकवण्याचं काम आयटी सेल करत आहे.म्हणून त्याचा समाचार घ्यावा लागेल.महाराष्ट्राला प्रगल्भ करणार असून शक्तीमान करण्याचे विचारंही असतील.
Edited By- Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.