"मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने महाराष्ट्रात हिंदुत्वाचा गळा घोटला"

राऊत यांनी मनसे आणि भाजपवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन तोफ डागली आहे.
"मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने महाराष्ट्रात हिंदुत्वाचा गळा घोटला"
Sanjay Raut on Raj Thackeray, Saam Tv

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा राज्य सरकारला इशारा दिल्यानंतर राजकीय वातावरण तापलं. गुढीपाडव्याचा मनसे मेळावा, ठाण्याची उत्तरसभा आणि औरंगाबदच्या जाहीर सभेतही राज ठाकरे (Raj Thackeray) भोंगे उतरवण्याच्या मुद्द्यावर ठाम राहिले. त्यानंतर काल मंगळवारी राज ठाकरे यांच्यावर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मनसे (MNS) कार्यकर्त्यांना नोटिसाही धाडल्या. मुंबई पोलिसांनीही ठाकरे यांना नोटिस दिली होती. या पार्श्वभूमीवर भोंग्याच्या विषयावरुन राजकीय वर्तुळात नेत्यांचा आवाज धुमसत आहे. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधत मनसे आणि भाजपवर (BJP) हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन तोफ डागली आहे. मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने महाराष्ट्रात हिंदुत्वाचा गळा घोटला. असा घणाघात राऊत यांनी विरोधकांवर केला आहे.

Sanjay Raut on Raj Thackeray,
मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरेंनी धर्म, संस्कृती, हिंदुत्व गहाण ठेवलं: सोमय्या

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले, मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने महाराष्ट्रात हिंदुत्वाचा गळा घोटला आहे. भोंग्याच्या प्रकरणाचा सर्वाधिक फटका हिंदुत्ववाद्यांना बसला आहे. शिर्डी, त्र्यंबकेश्वरमध्ये विश्वास्थांकडे तक्रार केलीय. त्यामुळे हिंदुत्वासाठी, श्रद्धांळूसाठी काळा दिवस आहे. भाजपने मनसेला पुढे करून गोंधळ घालायचा प्रयत्न केला. राज्यातील प्रमुख श्रद्धास्थान शिर्डी, त्र्यंबकेश्वरमध्ये काकड आरती होते. भाविक आरतीचा आनंद घेतात. परंतु, भोंग्यांच्या विषयामुळे आज काकड आरती झाली नाही. त्यामुळे अनेक लोकांनी अन्याय होत असल्याच्या तक्रार केल्या आहेत.

तसंच विरोधकांवर टीका करत राऊत पुढे म्हणाले, भोंग्यांचा वाद धार्मिकंच आहे. यामागे भाजपाचे कारस्थान आहे. भाजपला जे जमत नाही ते लहान पक्षांना हाताशी धरून असे प्रकार करत असतात. अनेक धार्मिक कार्यक्रम रद्द झाल्याने अनेक तक्रारी आल्या आहेत, याला जबाबदार नवहिंदुत्ववादी आहेत. तसंच आरती रद्द करण्याच्या मुद्द्यावर राऊत बोलले, हे इतिहासात घडलं नाही. मात्र भजपामुळे हे घडलं. हे भोंगे त्यांच्यावरच उलटणार आहेत. फूट पाडण्याचे मनसेचे आंदोलन आहे. पण यात महाराष्ट्राची जनता सहभागी होणार नाही. निवडणुकीची तयारी करू, मंत्रीमंडळ निर्णयाबाबत मी काही बोलणार नाही. असंही राऊत म्हणाले.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.