
कल्याण : शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत (Vinayak Raut ) यांनी कल्याणमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं.'नितेश राणे यांची समाजामध्ये काय लायकी आहे.स्वतःचा पक्ष बुडीत काढला,राणे कुटुंबीयांनी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी भाजपची लाचारी सुरू केली आहे,अशा शब्दात विनायक राऊत यांनी नितेश राणेंवर (Nitesh Rane ) जोरदार हल्लाबोल केला. खासदार राऊत आज कल्याणमध्ये आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी कल्याणात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ( Vinayak Raut Latest News In Marathi )
हे देखील पाहा -
विनायक राऊत यांनी कल्याणमध्ये मेळाव्यात राणे कुटुंबाचा चांगलाच समाचार घेतला. तसेच नितेश राणे यांच्यावर तुफान बरसले. नितेश राणे यांची समाजामध्ये काय लायकी आहे. स्वतःचा पक्ष बुडीत काढला. राणे कुटुंबीयांनी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी भाजपची लाचारी सुरू केली आहे. नितेश राणे यांची बकवासगिरी आम्ही आता मोडीत काढली आहे, अशा शब्दात विनायक राऊतांनी राणेंवर हल्ला चढवला. राऊतांच्या टीकेवर नितेश राणे काय प्रत्युत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नितेश राणेंनी केली होती संजय राऊतांवर टीका
दरम्यान, दिवा शहरात भारतीय जनता पार्टीचे मध्यवर्ती कार्यालय व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. त्यावेळी नितेश राणे म्हणाले, 'संजय राऊत यांच्यासारख्या लोकांना महत्व द्यायचं नाही, असं आम्ही ठरवलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा संजय राऊत यांनी एकटे अयोध्या सोडा, मुंबई-महाराष्ट्र तरी फिरले तरी काय अवस्था होईल हे कळेल.संजय राऊत हे नक्की शिवसेनेच्या की राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदार झाले आहेत?' असा सवाल करत नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली होती.
Edited By - vishal Gangurde
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.