Thane: महापालिका निवडणुकीपुर्वी शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपली

लोकशाही आघाडीमध्ये दुधात मिठाचा खडा टाकण्याचे काम आनंद परांजपे करत आहेत.
Thane Muncipal Corporation
Thane Muncipal CorporationSaam TV

मुंबई: ठाणे महानगर पालिकेतील (Thane Muncipal Corporation) नगरसेवकांची मुदत आज संपत असतानाच राज्यात महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात कलगी तुरा सुरू झाला आहे. ठाण्यातील सेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका जाहीर होण्यापूर्वी चिखलफेक करण्यास सुरुवात केली आहे. मी जे काही बोललो त्याचा विपर्यास आनंद परांजपे यांनी केला आहे.

लोकशाही आघाडीमध्ये दुधात मिठाचा खडा टाकण्याचे काम आनंद परांजपे करत आहेत. मी शिवसेनेचा महापौर असल्यामुळे सेनेच्या नगरसेवकांना प्राधान्य देणार. माझी भाजप बरोबर नैसर्गिक युती होती. आता लोकशाही आघाडीमध्ये आहे, न बोललाली वाक्य तोंडात टाकण्याचं काम आनंद परांजपे यांनी केल्याचा आरोप देखील नरेश म्हस्के यांनी केला आहे.

एकीकडे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख महाविकास आघाडी झालीच पाहिजे, असे म्हणत असतानाच ठाण्याचे विद्यमान महापौर नरेश म्हस्के हे शिवसेना-भाजप नैसर्गिक युतीचे दाखले देत आहेत. त्यामुळे ठाण्याची शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर की महापौर नरेश म्हस्के यांच्या विचाररणीवर चालते? याचा खुलासा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मा. खा. आनंद परांजपे यांनी लागावला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com