Uddhav Thackeray, neelam gorhe
Uddhav Thackeray, neelam gorhe saam tv

Uddhav Thackeray : नागांना निष्ठेचं दूध पाजलं, पण....; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटावर डागली तोफ

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या चाळीस आमदारांसह बंडाचा झेंडा फडकवल्याने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) यांच्यात जो राजकीय संघर्ष पेटला त्याचे पडसाद आजही राज्यात पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन शिवसेना पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे, असं निष्ठावंत शिवसैनिक म्हणत आहेत. अशातच ठाकरे गटानेही निष्ठा यात्रा सुरु करुन शिवसैनिकांची मोट पुन्हा एकदा नव्या जोशात बांधायला सुरुवात केलीय. अशातच उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर तोफ डागली आहे. कालच नागपंचमी झाली, असं बोलतात की, नागाला किती दूध पाजलं तरी चावायचा तो चावतोच. या सर्वांना निष्ठेचं दूध पाजलं पण कार्यकर्ते गद्दार निघाले, अशा कठोर शब्दांत ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

Uddhav Thackeray, neelam gorhe
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला केला, भाजपच्या आमदाराचा गंभीर आरोप

माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. आदित्य ठाकरे शिवसेनेच्या निष्ठा यात्रेत शिवसैनिकांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी टीपण्णी केली आहे. गद्दार बोलताना बैलाला त्रास होईल असं बोलू नका, बैल शेतकऱ्याचा राजा आहे, अशी प्रतिक्रिया देत बंडखोरांना ठाकरे यांनी डीवचलं आहे.

कालच नागपंचमी झाली, असं बोलतात की नागाला किती दूध पाजलं तरी चावायचं तो चावतोच. या सर्वांना निष्ठेचं दूध पाजलं पण ते गद्दार निघाले. जळगाव मध्ये भाजपने गुलाब पाहिला आता सैनिकांचे काटे बघायचे. जळगाव मध्ये एक गुलाब गेलं दुसरे गुलाबराव वाघ आपल्या सोबत आहेत, असा अप्रत्यक्ष टोला ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला आहे. आता मी राज्यभर फिरणार आहेस तेव्हा सविस्तर बोलेल. सदस्य नोंदणी वर भर द्या. सोक्षमोक्ष व्हायचा असेल तर होऊन जाऊ द्या, विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून देऊ, असंही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray, neelam gorhe
Shivsena : 'तुम्ही ज्या शाळेत शिकला आहात, त्या...' सुषमा अंधारे यांचा बंडखोर आमदारांना इशारा

तसेच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनीही माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सावंत म्हणाले, आम्ही प्रवक्ते आहोत,आता काही पोपट झालेत ते रोज काही बोलत असतात. मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न होतोय. राज्यपाल यांनी राज्याचा अपमान केला,सातत्याने ते असे करीत आहेत.जाती जातीवर दुही माजवण्याचे काम त्यांनी केले.पण दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांना अटक झाली आणि मुद्दा झाकण्याचा प्रयत्न झाला. ती महत्त्वाची बातमी झाकली गेली. काही भोंगे नेहमीच बोलतात.

वाईट भाषेत बोलतात,ते भाजपला मान्य आहे, असे समजायचे का ? असा सवालही सावंत यांनी उपस्थित केला.संजय राऊत प्रचंड हल्ले करीत होते. आमच्या पक्षाचे संवगडी आमच्या पाठीत सुरा खुपसून गेले,तेव्हा वर्षा बंगला सोडला.महाराष्ट्र हळहळला, त्यासाठी नीतीमूल्ये लागतात. ती त्यांनी जपली.साळवे मूळ प्रश्नाला बगल देतात, शेड्युल दहा मध्ये राजकीय पक्ष वर असतो,असंही सावंत म्हणाले. दरम्यान, मागास वर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाकेंनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि आमदार सचिन अहिर उपस्थित होते.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com