Maharashtra politics : शिवसेना शाखा ताब्यात घेणार का? शिंदे गटातील बड्या नेत्याचं मोठं भाष्य,म्हणाले...

शिंदे गटाकडून शिवसेना शाखा ताब्यात घेण्याच्या चर्चेवरून मंत्री दादा भुसे यांनी भाष्य केलं आहे.
eknath shinde and uddhav Thackeray
eknath shinde and uddhav Thackeray Saam tv

तबरेज शेख

Dada Bhuse News : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव, पक्षाचं चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात आणखी संघर्ष पेटला आहे. शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्हानंतर शिंदे गट शिवसेना शाखा ताब्यात घेणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिंदे गटाकडून शिवसेना शाखा ताब्यात घेण्याच्या चर्चेवरून मंत्री दादा भुसे यांनी भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

मंत्री दादा भुसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दादा भुसे म्हणाले, आग्र्याच्या किल्ल्यात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली. पूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटला आहे. याच निमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. ज्यांच्यावर उपचार करू शकतो, त्यांच्यावर तातडीने उपचार केले जातील'.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले, 'आज किती महत्त्वाचा दिवस आहे. देवांच्या आशीर्वादाने प्रभू श्रीरामचंद्र यांचे धनुष्यबाण, एकलव्य महाराज यांचे धनुष्यबाण, छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे धनुष्यबाण, बाळासाहेब ठाकरे यांचे धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसैनिकांना बहाल करण्यात आले आहे. मला तर त्यांची कीव येते. ते बोलायला लागले की लोक टीव्ही बंद करतात'.

शिवसेना (Shivsena) शाखा ताब्यात घेणार का, यावर भाष्य करताना दादा भुसे म्हणाले, 'खालच्या पातळीवर जाऊन समोरचे लोक राजकारण करत आहे. तसं टाळूवरचं लोणी खाण्याचे काम आम्ही करणार नाही. काल पर्यंत आम्ही सोबत होतो. आम्ही चांगले शिवसैनिक होतो. आता आम्ही चोर झालो, खोकेवाले झालो'.

'आज पण आम्ही आदर राखतो, महाराष्ट्राची संस्कृती आहे. घरात बसून शिवसेना वाढलेली नाही.अनेक शिवसैनिकांनी बलिदान दिले आहे, जीवाची रान केले आहे. नुसतं टीव्हीच्या समोर येऊन, पोपटपंची करून शिवसेना वाढलेली नाही. या चांडाळ चौकटीने शिवसेनेचा घात केला आहे. आम्हाला काय कुणाच्या ताटातील काढून घायचे नाही, अशी टीका दादा भुसे यांनी केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com