मुंबईच्या सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या आवाजातील तिसरा टीझर आला, पाहा Video

शिवसेनेनं तिसरा आक्रमक टीझर प्रदर्शीत करुन विरोधकांना इशारा दिला आहे.
मुंबईच्या सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या आवाजातील तिसरा टीझर आला, पाहा Video
Uddhav Thackeray SAAM TV

मुंबई : आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये राजकीय कुरघोड्या सुरु आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गेल्या महिन्यात झालेल्या मनसे मेळाव्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर तोफ डागली. त्यानंतर भाजपने (BJP) मुंबईत बुस्टर डोस सभा घेवून शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरूनही भाजपने शिवसेनेवर टीका केली. या सर्व घडामोडीनंतर विरोधकांचा समाचार घेण्यासाठी आता शिवसेनाही येत्या १४ मे ला जाहीर सभा घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं तिसरा आक्रमक टीझर प्रदर्शीत (Teaser launch) करुन विरोधकांना इशारा दिला आहे. तुम्ही फक्त मला वज्रमुठ द्या,दात पाडायचं काम मी करुन दाखवतो. अशा शब्दांत (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे.

Uddhav Thackeray
अरे बापरे! कोरोनानंतर आता टोमॅटो फिव्हरचा धुमाकूळ; आतापर्यंत 80 मुलांना संसर्ग

शिवसेना येत्या १४ मे ला सभा घेत असून विरोधकांवर हल्लाबोल करण्यासाठी आक्रमक टीझर प्रसिद्ध केले आहेत. शिवसेनेच्या तिसऱ्या टीझरमध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांवर खरमरीत टीका केलीय. तुम्ही मला फक्त वज्र मुठ द्या,दात पडायाचं काम मी करून दाखवतो.हिंदुत्वाचा खरा अर्थ दाखवुन द्यायला..शिवसेनेच्या अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घ्यायला..यायलाच पाहीजे.अशा ठाकरी भाषेत शिवसेनेने विरोधकांवर टीका केलीय.

महापालिकेच्या कार्यक्रमातून जनतेला संबोधित करताना ठाकरेंनी मुंबईच्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. यावेळी ठाकरे म्हणाले होते , गेले काही दिवस आपण माणसातच आलो आहोत. आज मास्क काढला, पण तसा मास्क काढायचा आहे तो 14 तारखेला काढीन.हा मुंबई महापालिकेचा कार्यक्रम आहे, त्यामुळे राजकीय भाषण करून पाणी गढूळ करणार नाही. तसा मी मुंबईतच जन्माला आलो. पण मुंबई आता बदलत चालली आहे. निवडणूक सोडून आता फक्त एकच तिकीट सगळीकडे चालेल.बस सेवा ही आपली रक्त वाहिनी आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.